मुंबई - चीनमध्ये पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे भारत आणि चीनमधील व्यापारावर विपरीत परिणाम झाला असून इलेक्ट्रॉनिक वस्तू महागण्याची चिन्हे आहेत. या विषाणूचा प्रादुर्भाव जरी चीनमध्ये असला, तरी भारतात उद्योगासाठी नैसर्गिक आपत्ती घोषित होण्याची शक्यता असल्याचे इंडियन मर्चंट्स चेम्बर्सने म्हटले आहे.
कोरोनाच्या संसर्गाचा भारतीय उद्योगासह पर्यटनावर परिणाम, इलेक्ट्रॉनिक वस्तू महागणार - hubei
चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गाचा कहर अजूनही सुरूच आहे. हुबेई प्रांताच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, या संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा आता २ हजार २३६ झाला आहे.

हेही वाचा -चिकनमध्ये 'कोरोना' असल्याच्या अफवांमुळे पोल्ट्री उद्योग सलाईनवर
या रोगामुळे फक्त उद्योगावरच नाही, तर पर्यटनावरही परिणाम झाला आहे. यामुळे चीनकडे जाणारी अनेक उड्डाणेही रद्द करण्यात आली आहे. चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गाचा कहर अजूनही सुरूच आहे. हुबेई प्रांताच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, या संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा आता २ हजार २३६ झाला आहे. याशिवाय, आणखी ४११ जणांना विषाणूची लागण झाली आहे. आता हा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या तब्बल ७५ हजार ४६५ वर पोहोचली आहे.