महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना व्हायरसचा धोका, 4 संशयित रुग्ण कस्तुरबा रुग्णालयात दाखल - corona virus symptoms

कोरोना व्हायरस हा विषाणू प्रजातीतील असून उंट, मांजर यासारख्या प्राण्यांच्या माध्यमातून त्याचा प्रसार होतो. ज्या मनुष्याच्या शरीरात हा विषाणू शिरकाव करतो त्याला सर्दी, ताप, खोकल्याची लागण होऊन श्वसनाला त्रास होतो. हा आजार न्यूमोनियासारखा असल्याने यामुळे रुग्णाचे मूत्रपिंड (किडनी) निकामी होण्याची शक्यता असते.

corona virus
कोरोना व्हायरस

By

Published : Jan 27, 2020, 1:41 PM IST

Updated : Jan 27, 2020, 4:21 PM IST

मुंबई- कोरोना व्हायरसचे 4 संशयित रुग्ण पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल झाले आहेत. यामधील 3 रुग्ण चीनमधून, तर 1 हाँगकाँगमधून प्रवास करून आलेला आहे.

सुरेश काकाणी, अतिरिक्त पालिका आयुक्त

कोरोना व्हायरसच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी कस्तुरबा रुग्णालयात 4 विशेष कक्ष तयार करण्यात आले आहे, तर 16 बेड तयार करण्यात आले आहेत. गरज पडल्यास आणखी कक्ष सुरू केले जातील. पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था येथे रुग्णांच्या रक्ताची तपासणी केली जाणार आहे, असे पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

कोरोना व्हायरसची लक्षणे -

खोकला, अंगदुखी, ताप अशी लक्षणे असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा कस्तुरबा रुग्णालयात उपचार घ्यावेत. तसचे रोगप्रतिकार शक्ती वाढल्यावर हा आजार बरा होतो. त्यामुळे घाबरून जाऊ नये, असे आवाहन पालिकेने केले आहे.

Last Updated : Jan 27, 2020, 4:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details