मुंबई :कोरोनाची सुरुवात मुंबईत झाली. कोरोना धारावीत शिरला आणि मुंबईकरांच्या आणि प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली. प्रशासनाने कंबर कसली आणि धारावीतला कोरोना आटोक्यात आणला. मुंबईत राबवलेल्या धारावी मॉडेलचं कौतुक जगात झालं. जागतिक पातळीवर धारावी मॉडेलची दखल घेण्यात आली. धारावीत आता लसीकरणाला वेग यावा यासाठी मुंबई महानगरपालिकेने एक नवीन प्रारूप तयार केलं आहे. धारावीत सोमवारपासून लसीकरण केंद्राची सुरुवात होणार आहे. एकाच दिवशी एक हजार लाभार्थ्यांना लस देण्याचं नियोजन आखण्यात आला आहे.
धारावीत लसीकरण केंद्र सुरू; दिवसाला हजार लाभार्थ्यांना लस देण्याचं लक्ष्य - धारावी कोरोना लसीकरण केंद्र
राज्यात तिसऱ्या टप्प्यात लसीकरण सुरू आहे. लसीकरणादरम्यान धारावीतून लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे सोमवारपासून धारावीतल्या नागरी आरोग्य केंद्रात लसीकरणाला सुरुवात होणार आहे. लसीकरणासाठी स्वयंसेवी संस्था तसेच खासगी डॉक्टर यांची मदत घेतली जाणार आहे..
राज्यात तिसऱ्या टप्प्यात लसीकरण सुरू आहे. लसीकरणादरम्यान धारावीतून लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे सोमवारपासून धारावीतल्या नागरी आरोग्य केंद्रात लसीकरणाला सुरुवात होणार आहे. लसीकरणासाठी स्वयंसेवी संस्था तसेच खासगी डॉक्टर यांची मदत घेतली जाणार आहे.
धारावीतील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे दीड ते दोन लाख लोक हे 45 ते 60 वयोगटातील, सहव्याधी असलेले तसेच ज्येष्ठ नागरिक असल्याचा पालिकेचा अंदाज आहे. यांचे लसीकरण करण्यासाठी लसीकरण केंद्रावर पाच कक्ष उभे करण्यात येणार आहेत, ज्यामुळे एकाच वेळी पाच जणांना लस देता येणार आहे. दिवसाला एक हजार लाभार्थ्यांचे लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.