मुंबई -देशात जानेवारी महिन्यापासून कोरोनाचे लसीकरण सुरू झाले आहे. मात्र, गेल्या काही दिवसात रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने राज्यात लसीकरण प्रक्रियेला वेग आला आहे. सोमवारी राज्यात 1 लाख 22 हजार 758 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. यातील 1 लाख 7 हजार 165जणांना पहिला तर, 15 हजार 593जणांना दुसरा डोस देण्यात आला.
रुग्णसंख्येत वाढ झाल्याने राज्यात कोरोना लसीकरणाला वेग - महाराष्ट्र कोरोना लसीकरण गती न्यूज
देशात गेल्या वर्षभरापासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. मध्यंतरी कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाली होती. त्यामुळे आरोग्य यंत्रणांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. परिणामी राज्यात लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे.
राज्यातील लसीकरणाचा थोडक्यात आढावा -
राज्यात सोमवारी एकूण 1 लाख 22 हजार 758 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. यातील 1 लाख 7 हजार 165जणांचा पहिला तर, 15 हजार 593जणांचा दुसरा डोस होता. 8 हजार 717 आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला तर 11 हजार 865 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. 8 हजार 199 फ्रंटलाईन वर्कर्सला पहिला तर 3 हजार 728 फ्रंटलाईन वर्कर्सला दुसरा डोस दिला गेला. 45 ते 60 वयोगटातील गंभीर आजार असणाऱ्या 14 हजार 26 लाभार्थ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला. 60पेक्षा जास्त वय असणाऱ्या 76 हजार 223 लाभार्थ्यांना पहिला डोस देण्यात आला.
राज्यातील कोणत्या भागात किती लाभार्थ्यांना मिळाली लस
अहमदनगर - 60 हजार 783
अकोला - 27 हजार 481
अमरावती - 38 हजार 492
औरंगाबाद -54 हजार 151
बीड - 33 हजार 597
भंडारा - 23 हजार 831
बुलडाणा -27 हजार 150
चंद्रपूर - 36 हजार 803
धुळे - 23 हजार 774
गडचिरोली - 19 हजार 133
गोंदिया - 25 हजार 889
हिंगोली - 15 हजार 171
जळगाव - 39 हजार 245
जालना - 26 हजार 502
कोल्हापूर - 72 हजार 254
लातूर - 33 हजार 104
मुंबई - 3 लाख 50 हजार 285
नागपूर - 1 लाख 7 हजार 68
नांदेड - 29 हजार 476
नंदुरबार - 23 हजार 839
नाशिक - 80 हजार 608
उस्मानाबाद - 17 हजार 642
पालघर - 46 हजार 229
परभणी - 20 हजार 377
पुणे - 2 लाख 2 हजार 96
रायगड - 30 हजार 677
रत्नागिरी - 26 हजार 296
सांगली - 43 हजार 668
सातारा - 66 हजार 247
सिंधुदुर्ग - 14 हजार 126
सोलापूर - 48 हजार 803
ठाणे - 1 लाख 50 हजार 301
वर्धा - 31 हजार 85
वाशिम - 15 हजार 292
यवतमाळ - 43 हजार 913