मुंबई Corona Update : मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनानं डोकं वर काढल्याचं चित्र आहे. कारण दिवसेंदिवस कोरोना JN-1 या व्हेरियंटच्या रुग्णसंख्येत वाढ होताना पाहायला मिळत आहे. (Omicron Variant) गुरुवारी राज्यात 144 कोरोनाचे रुग्ण आढळले होते. तर शुक्रवारी पुन्हा एकदा कोरोनाचे 95 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं चिंता वाढली असून, काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे.
JN-1 व्हेरियंट धोकादायक नाही:कोरोनाच्या JN-1 या व्हेरियंटच्या रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. परंतु, कोरोनाचा हा व्हेरियंट घातक नसल्याचं आरोग्यतज्ज्ञांनी म्हटलं आहे. कारण यापूर्वी कोरोनाचा ओमायक्रॉन हा व्हेरियंट आला होता. हा व्हेरियंट आरोग्यास घातक होता. या व्हेरियंटने शरीरात शिरकाव केल्यानंतर शरीरातील रोगप्रतिकार शक्ती कमी करत असे. ओमायक्रॉन या व्हेरियंटची लागण झाल्यामुळं अनेक लोकांचे मृत्यू झाल्याचे आपण पाहिले आहे. पण कोरोनाच्या JN-1 हा व्हेरियंट ओमायक्रॉनसारखा घातक नसून, साधारण व्हेरियंट आहे. जरी तुम्हाला याची लागण झाली तरी तुम्ही त्यातून बरे होऊ शकता. त्यामुळं घाबरण्याचं कारण नाही, असं आरोग्यतज्ज्ञ अविनाश भोंडवे यांनी म्हटलं आहे.
JN-1 या व्हेरियंटची लक्षणे कोणती?कोरोनाच्या JN-1 व्हेरियंट हा साधारण आहे आणि याची कित्येक लोकांना लागण देखील झाली असेल. पण कोरोनाची चाचणी न केल्यामुळं कोरोनाची लागण झाली की नाही, हे माहिती पडले नाही. पण जसे तुम्हाला खोकला, सर्दी, फडसे, थंडी, ताप, कणकणी, हातपाय वळणे आणि अस्वस्थता यापैकी काहीही जाणवते. त्याचप्रकारे कोरोना JN-1 या व्हेरियंटची लक्षणं असल्याचं आरोग्यतज्ज्ञ अविनाश भोंडवे यांनी सांगितलं. त्यामुळं घाबरून जाण्याचं कारण नाही असंही भोंडवे म्हणाले.
काळजी कशी घ्याल?जर तुम्हाला थंडी, ताप, कणकणी, हातपाय वळणे, सर्दी, फडसे यापैकी काहीही जाणवत असेल तर डॉक्टरच्या सल्ल्याने औषध घ्या. या काळात पाणी उकळून प्या. तोंडावर मास्क किंवा रुमालचा वापर करा. सार्वजनिक ठिकाणी किंवा गर्दीत जाण्याचं टाळा. वेळेवर आहार आणि औषध घ्या. यामुळं तुम्ही कोरोनावर मात करू शकाल. तसेच खोकला, सर्दी, फडसे, थंडी, ताप, कणकणी, हातपाय वळणे हे असताना जरी तुम्ही औषधं घेतली तरीसुद्धा सहा ते आठ दिवस तुम्हाला वरील त्रास जाणवेलच. त्यामुळं घाबरून जाऊ नका आणि JN-1 व्हेरियंट घातक किंवा धोकादायक नाही. तसेच या व्हेरियंटमुळं मृत्यूमुखी पडण्याचं प्रमाण खूपच कमी असल्याची माहिती आरोग्यतज्ज्ञ अविनाश भोंडवे यांनी दिली.
हेही वाचा:
- मिलिंद देवरांच्या राजीनाम्याबाबत काँग्रेसचा थेट पंतप्रधान मोदींवर आरोप, 'हा' केला मोठा दावा
- घरात एकच बल्ब, मजुराला तब्बल 1 कोटी 29 लाखाचं बिल; वीज वितरण कंपनीच्या कारभारानं मजूर हादरला
- नारायण राणेंच्या शंकराचार्यांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक; जिवंत कोंबडी आणून निषेध!