महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर.. - कोरोना न्यूज

corona Live update
कोरोना

By

Published : Jun 10, 2021, 6:36 AM IST

Updated : Jun 10, 2021, 10:47 PM IST

22:38 June 10

महाराष्ट्रात 12 हजार 207 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, 393 मृत्यू

मुंबई -महाराष्ट्रात आज (दि. 10 जून) 12 हजार 207 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 393 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासांत 11 हजार 449 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 58 लाख 75 हजार 87 रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 56 लाख 8 हजार 753 कोरोनामुक्त झाले आहे तर 1 लाख 3 हजार 748 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या 1 लाख 60 हजार 693 सक्रिय रुग्ण असून विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. 

22:36 June 10

कोरोना योद्धांनी प्राणवायुला स्मरत रत्नेश्वरी शिवारात केले वृक्षारोपण

नांदेड - कोविड-19सारख्या आजारातील विविध आव्हानाचा सामना व विशेषत: प्राणवायुचे महत्व अधोरेखित करुन जिल्ह्यात वृक्षारोपण चळवळीला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित प्रातिनिधिक वृक्षारोपण शुभारंभास कोविड योध्दांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यात अवघ्या चार वर्ष वयाच्या श्रद्धा श्रीकांत सूर्यवंशी या कोरोना बाल योद्धाने मान्यवरासह वृक्षारोपण करुन सर्वाचे लक्ष वेधून घेतले. राज्यातील या अभिनव ठरलेल्या उपक्रमांची विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात झाली.

22:35 June 10

मुंबईत कोरोनाचे 660 नवे रुग्ण, 22 रुग्णांचा मृत्यू

मुंबई -शहरात गेले काही दिवस कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते, त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. आज 660 नवे रुग्ण आढळून आले आहेत. आज 22 रुग्णांचा मृत्यू झाला तर 768 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी 566 दिवसांवर पोहचला आहे.

22:27 June 10

आम्ही मृत्यूचे कोणतेही आकडे लपवले नाही; सरकार पारदर्शकपणे काम करते आहे - राजेश टोपे

मुंबई -राज्य सरकारकडून कोणत्याही आकडे लपवले जात नाही. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा राज्यसरकारने लपवलेला नाही, राज्य सरकार पारदर्शक आणि प्रामाणिकपणे काम करत असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. कोरोनामुळे लोकांच्या झालेल्या मृत्यूच्या आकड्यात लपवालपव केल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जातो आहे. यातच 11 हजार मृत्यू राज्य सरकारच्या पोर्टलवर लपवण्याचा आल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण देत मृत्यूच्या आकड्यांमध्ये आरोग्य विभागाकडून लपवाछपवी केली नसल्याचे सांगण्यात आले आहे.

22:16 June 10

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क - डॉ. अर्चना भोसले

बोलताना डॉ. अर्चना भोसले

जालना - आरोग्य विभागाने कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली आहे. ही लाट ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, ही लाट बालकांमध्ये आणि गर्भवती महिलांसाठी जास्त परिणाम असल्याचा अंदाज वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, याची पूर्वतयारी सुरू झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी दिली आहे.

22:13 June 10

कोरोनाचे नियम मोडणाऱ्या नागरिकांवर कारवाई, 43 लाख रुपयांचा दंड वसूल

पंढरपूर (सोलापूर) - तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात आली. राज्य सरकारने या पार्श्वभूमीवर नियमावली तयार केली. त्या नियमावलीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी तालुक्यात सगळीकडे अंमलबजावणी केली. एक मार्चपासून पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोना संबंधीच्या नियमांचे जे पालन करत नाहीत, त्यांच्या विरोधात पोलीस प्रशासनाकडून दंड आकारण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाने 67 लाख रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती, विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली आहे.

19:52 June 10

सात दिवसांच्या टाळेबंदीनंतर आज जिल्हा 'अनलॉक', बाजारात गर्दी

सात दिवसांच्या टाळेबंदीनंतर आज जिल्हा 'अनलॉक', बाजारात गर्दी

रत्नागिरी -सात दिवसांच्या कडक लॉकडाऊननंतर आज (दि. 10 जून) जिल्हा अनलॉक झाल्यामुळे बाजारात खरेदीसाठी गर्दी दिसत होती. मागील सात दिवस वैद्यकीय, मेडिकल वगळता इतर सर्व दुकाने, आस्थापना बंद होती. मात्र, आजपासून अत्यावश्यक सेवेतील दुकानांसाठी 9 ते 4 वाजेपर्यंत शिथिलता देण्यात आली आहे.

19:31 June 10

बार्शीतील स्मशानभूमीत लाकडांचा अड्डा; ना परवानगी ना पावती

प्रतिनिधी

बार्शी (सोलापूर) - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण वाढले होते. या प्रतिकूल परिस्थितीत अनेक सामाजिक संघटना रुग्णांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी समोरही आल्या. हे जरी वास्तव असले तरी दुसरी बाजूही समजून घेणे आवश्यक आहे. रुग्णाच्या मृत्यूनंतर दहनविधीसाठी लागणाऱ्या लाकडांची खरेदीसाठी चक्क स्मशानभूमीतच लाकडाचा अड्डा उभारण्यात आला आहे.

19:04 June 10

आम्ही मृत्यूचे कोणतेही आकडे लपवले नाही; सरकार पारदर्शकपणे काम करते आहे - राजेश टोपे

मुंबई -राज्य सरकारकडून कोणत्याही आकडे लपवले जात नाही. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा राज्यसरकारने लपवलेला नाही, राज्य सरकार पारदर्शक आणि प्रामाणिकपणे काम करत असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. कोरोनामुळे लोकांच्या झालेल्या मृत्यूच्या आकड्यात लपवालपव केल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जातो आहे. यातच 11 हजार मृत्यू राज्य सरकारच्या पोर्टलवर लपवण्याचा आल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण देत मृत्यूच्या आकड्यांमध्ये आरोग्य विभागाकडून लपवाछपवी केली नसल्याचे सांगण्यात आले आहे.

16:50 June 10

आश्चर्य...कोरोनाची लस घेतल्यानंतर शरीर झाले लोहचुंबक, पाहा व्हिडिओ..

कोरोनाची लस घेतल्यानंतर शरीर झाले लोहचुंबक

नाशिक -कोरोनाच्या लसीबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा होत असताना आता नाशिकच्या एका जेष्ट नागरिकाने कोरोनाची दुसरी लस घेतल्या नंतर त्यांच्या शरीराला लोखंडी वस्तू चिटकू लागल्या आहेत. या घटनेची नाशिकमध्ये चर्चा होत असून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या बाबत 'ईटीव्ही भारत' ने रियालीटी चेक करून सत्य जाणून घेतले.

15:07 June 10

कोरोना महामारीचे संकट पाहता पालखी सोहळा लालपरीनेच व्हावा

आळंदी (पुणे)-संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यावर मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही कोरोना महामारीचे सावट आहे. यामुळे मागील वर्षी झालेल्या चुका टाळून यावर्षीही माऊलींचा पालखी सोहळा मोजक्याच भाविकांत व्हावा अशी मागणी करण्यात आली. भाविकांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव लालपरी बसने आळंदी ते पंढरपूर व्हावा अशी मागणी आळंदी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन आळंदी नगरपरिषद, आळंदी देवस्थान, पुणे जिल्हाधिकारी,पोलिस आयुक्त तसेच उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालक मंत्री अजित पवार यांना आळंदी ग्रामस्थांचे वतीने माऊली भक्त ज्ञानेश्वर कुऱ्हाडे पाटील यांनी दिले असल्याचे सांगितले.

10:12 June 10

गेल्या २४ तासांत देशात ६ हजार १४८ रुग्ण दगावले, आतापर्यंतची उच्चांकी संख्या

नवी दिल्ली - देशात गेल्या २४ तासांत आतापर्यंतच्या सर्वाधिक मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे बुधवारी ६ हजार १४८ रुग्ण दगावले असून ९४ हजार ५२ नवीन रुग्ण आढळले आहे. शिवाय १ लाख ५१ हजार ३६७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, एकूण रुग्णांची संख्या २ कोटी ८१ लाख ८३ हजार १२१ वर पोहोचली असून आतापर्यंत ३ लाख ५९ हजार ६७६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

07:20 June 10

कोरोनामुळे पालक गमावलेल्या एक हजार मुलांना दत्तक घेण्याचा पुरुषोत्तम धोंडगेंचा निर्णय

नांदेड - कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या पाल्यांना दत्तक घेण्याचा निर्णय पुरुषोत्तम धोंडगे यांनी घेतला आहे. कोरोना काळात घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने अनेकांपुढे मुलांच्या संगोपणाचा प्रश्न उभा ठाकला आहे. मात्र पुरुषोत्तम धोंडगे यांच्या उपक्रमामुळे छत्रछाया हरवलेल्या मुलांना आधार मिळणार आहे.

06:21 June 10

राज्यात बुधवारी 16 हजार 379 रुग्ण कोरोनामुक्त, 10 हजार 989 नवे रुग्ण

मुंबई -राज्यात बुधवारी (दि. 9 जून) दिवसभरात 16 हजार 369 रुग्ण करोनातून बरे झाले असून 10 हजार 989 नव्या कोरोनाग्रस्त आढळून आले. 261 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद देखील झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 55 लाख 97 हजार 304 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 95.45 टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यात आजपर्यंत 1लाख 1 हजार 833 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला असून, राज्याचा मृत्यूदर 1.74 टक्के एवढा आहे.

Last Updated : Jun 10, 2021, 10:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details