मुंबई- देशात कोरोना आटोक्यात येत असताना अचानक कोरोनाग्रस्तांची वाढण्यास सुरुवात झाली आहे. दिल्ली, कर्नाटक, केरळसह महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. मागील 24 तासांत (दि. 12 जून रात्रीपर्यंत) देशभरात 8 हजार 84 नव्या कोनाग्रस्तांची नोंद झाली असून त्यापैकी महाराष्ट्रात ( Maharashtra Corona Update ) 2 हजार 946 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच दोघांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यातील एकट्या मुंबईत ( Mumbai Corona Update ) 1 हजार 803 रुग्ण आढळले आहेत. यामुळे सक्रिय रुग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण - मागील 24 तासांत देशभरात 8 हजार 84 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात राज्यात नोंदवले गेले आहेत. महाराष्ट्रात 2 हजार 946 ( Coronavirus in Maharashtra ) त्याखालोखाल केरळ ( Coronavirus in Kerala ) राज्यात 1 हजार 955 रुग्ण, दिल्लीत ( Coronavirus in Delhi ) 735 रुग्ण तर कर्नाटक राज्यात ( Coronavirus in Karnataka ) 463 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाकडून ( Ministry of Health ) देण्यात आली आहे.
सक्रिय रुग्णांची संख्या सुमारे 48 हजार - देशातील सक्रिय रुग्णांची ( Active Corona Patients in India ) संख्या 47 हजार 995 इतकी झाली असून त्यापैकी काही कमी जोखीम तर काही अति जोखीमेतील रुग्ण आहेत. आतापर्यंतच्या एकून कोरोनाग्रस्त रुग्णापैकी 0.11 टक्के सक्रिय रुग्णांची संख्या आहे. त्यातील 16 हजार 370 सक्रिय रुग्ण हे महाराष्ट्रातील ( Active Corona Patients in Maharashtra ) आहेत.