मुंबई -राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. तसेच25 नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक असणार आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. दिल्ली, राजस्थान, गोवा, गुजरातमधून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र असेल तरच महाराष्ट्रात प्रवेश मिळणार असल्याचेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. विमान, ट्रेन आणि रोडने येणाऱ्या सर्व प्रवाशांना हा कोरोना चाचणी करण्याचा नियम लागू असेल, असेही सरकारकडून सांगण्यात आले. आज राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी यासंदर्भात एक परिपत्रक जारी केले आहे.
म्हणून घेतला निर्णय -
मुंबईसह राज्यात मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. जून नंतर काही प्रमाणात लॉकडाऊनमधून शिथिलता देण्यात आली. धार्मिक सण, दिवाळी यानंतर पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी दिल्ली मुंबई विमान सेवा बंद करावी तसेच राज्याबाहेरून येणाऱ्या मेल एक्स्प्रेस गाड्यांवर बंदी घालण्याचीही मागणी करण्यात आली. यावेळी मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी बाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी मार्गदर्शक तत्वे बनवण्याची गरज असल्याचे म्हटले होते. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी येत्या आठ ते दहा दिवसांत रुग्ण संख्येचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले होते. तर रविवारीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनसारखा निर्णय घ्यायला भाग पाडू नका, असे म्हटले होते.
लॉकडाऊनचा निर्णय नाही, मात्र, निर्बंध कडक करणार-
राज्यात लॉकडाऊन लागण्या सदर्भात राजेश टोपे यांच्या नावाने माहिती प्रसारीत होत होती. मात्र, राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय मी जाहीर केला नाही, अथवा मी तसे कुठेही बोललो नसल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीनी त्यांच्या फोनवरून संवाद साधला असता, त्यांनी ही माहिती दिली.
राज्यात कोरोनाच्या नियमांचे पालन करावेच लागेल. मास्कचा वापर करावाच लागेल. सध्या सार्वजनिक ठिकाणी कोरोनाच्या दृष्टीने काळजी घेतली जात नाही. त्यामुळे या ठिकाणी शिथील करण्यात आलेले निर्बंध पुन्हा प्रामुख्याने लागू करण्यात येणार आहेत. राज्यात सध्या लॉकडाऊन जरी लागू करण्याचा विचार नसला तरी शिथील करण्यात आलेल्या निर्बंधांची पुन्हा काटेकोरपण अंमलबजावणी कऱण्यात येईल
गरज पडल्यास विमानसेवा बंद करू - वडेट्टीवार