मुंबई - परळ येथील बेस्ट कर्मचारी वसाहतीत राहणाऱ्या एका वाहकाच्या कुटुंबाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दोन दिवसांपूर्वी आली होती. मात्र, या बेस्ट वाहक, त्याची पत्नी आणि मुलाच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. या वृत्ताला बेस्टच्या जनसंपर्क विभागानेही दुजोरा दिला आहे.
'त्या' बेस्ट बस वाहकाच्या कुटुंबाची कोरोना चाचणी निगेटीव्ह
परळ येथील बेस्ट वाहक, त्याची पत्नी आणि मुलाच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. या बेस्ट वाहकाच्या जावयाला कोरोना झाल्यानंतर त्यांची मुलगी आणि नातही बाधित असल्याचे समोर आले होते. दोन दिवसांपूर्वी हे वृत्त कळताच बेस्ट वसाहतीतील एक इमारत प्रतिबंधित करण्यात आली होती.
या बेस्ट वाहकाच्या जावयाला कोरोना झाल्यानंतर त्यांची मुलगी आणि नातही बाधित असल्याचे समोर आले होते. दोन दिवसांपूर्वी हे वृत्त कळताच बेस्ट वसाहतीतील एक इमारत प्रतिबंधित करण्यात आली होती. तसेच तेथे निर्जंतुकीकरणही करण्यात आले. बेस्ट वाहकाच्या कुटुंबाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर बेस्ट वसाहतीतील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. लवकरच हे संपूर्ण कुटुंब सुखरूप बाहेर येवो, अशी प्रार्थनाही केली आहे.
कोरोना लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा देणाऱया कर्मचाऱयांना कोरोना संसर्गाचा धोका जास्त आहे. मात्र, या सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.