महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात 552 नवीन रुग्णांचे निदान, एकूण रुग्ण संख्या 5218 - आरोग्यमंत्री राजेश टोपे - corona numbers in maharashtra news

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८३ हजार १११ नमुन्यांपैकी ७७ हजार ६३८ जणांचे कोरोनाचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर ५२१८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९९ हजार ५६९ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ७,८०८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

corona status in maharashtra last 24 hours
राज्यात ५५२ नवीन रुग्णांचे निदान, एकूण रुग्ण संख्या ५२१८ - आरोग्यमंत्री राजेश टोपे

By

Published : Apr 21, 2020, 9:55 PM IST

Updated : Apr 21, 2020, 10:13 PM IST

मुंबई -आज राज्यात कोरोनाबाधित ५५२ नवीन रुग्णांची नोंद झाली असून एकूण रुग्ण संख्या ५२१८ झाली आहे. १५० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ७२२ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ४२४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८३ हजार १११ नमुन्यांपैकी ७७ हजार ६३८ जणांचे कोरोनाचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर ५२१८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९९ हजार ५६९ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ७,८०८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात १९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २५१ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबई येथील १२, पुण्यातील ३, ठाणे मनपामधील २ तर सांगली येथील १ आणि पिंपरी चिंचवड येथील १ रुग्ण आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी १० पुरुष तर ९ महिला आहेत. त्यात ६० वर्षे किंवा त्यावरील ९ रुग्ण आहेत. तर ९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर १ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या १९ मृत्यूंपैकी १२ रुग्णांमध्ये (६३ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

*राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील : (कंसात मृत्यूंची आकडेवारी)*
मुंबई महानगरपालिका: ३४५१ (१५१)
ठाणे: २२ (२)
ठाणे मनपा: १५० (४)
नवी मुंबई मनपा: ९४ (३)
कल्याण डोंबिवली मनपा: ९३ (२)
उल्हासनगर मनपा: १
भिवंडी निजामपूर मनपा: ६
मीरा भाईंदर मनपा: ८१ (२)
पालघर: १८ (१)
वसई विरार मनपा: १११ (३)
रायगड: १६
पनवेल मनपा: ३४ (१)
*ठाणे मंडळ एकूण: ४०७७ (१६९)*
नाशिक: ४
नाशिक मनपा: ६
मालेगाव मनपा: ८५ (८)
अहमदनगर: २१ (२)
अहमदनगर मनपा: ८
धुळे: २ (१)
धुळे मनपा: २
जळगाव: १
जळगाव मनपा: २ (१)
नंदूरबार: ४
*नाशिक मंडळ एकूण: १३५ (१२)*
पुणे: १९ (१)
पुणे मनपा: ६४६ (५२)
पिंपरी चिंचवड मनपा: ५१ (२)
सोलापूर: ०
सोलापूर मनपा: २५ (२)
सातारा: १३ (२)
*पुणे मंडळ एकूण: ७५४ (५९)*
कोल्हापूर: ६
कोल्हापूर मनपा: ३
सांगली: २६
सांगली मिरज कुपवाड मनपा:१ (१)
सिंधुदुर्ग: १
रत्नागिरी: ८ (१)
*कोल्हापूर मंडळ एकूण: ४५ (२)*
औरंगाबाद:१
औरंगाबाद मनपा: ३४ (३)
जालना: १
हिंगोली: १
परभणी: ०
परभणी मनपा: १
*औरंगाबाद मंडळ एकूण: ३८ (३)*
लातूर: ८
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ३
बीड: १
नांदेड: ०
नांदेड मनपा: ०
*लातूर मंडळ एकूण: १२*
अकोला: ७ (१)
अकोला मनपा: ९
अमरावती: ०
अमरावती मनपा: ६ (१)
यवतमाळ: १६
बुलढाणा: २१ (१)
वाशिम: १
*अकोला मंडळ एकूण: ६० (३)*
नागपूर: ३
नागपूर मनपा: ७६ (१)
वर्धा: ०
भंडारा: ०
गोंदिया: १
चंद्रपूर: ०
चंद्रपूर मनपा: २
गडचिरोली: ०
*नागपूर मंडळ एकूण: ८२ (१)*
*इतर राज्ये: १५ (२)*
*एकूण: ५२१८ (२५१)*

या तक्त्यातील रुग्णसंख्या रुग्णाने दिलेल्या पत्त्यानुसार आहे. काही रुग्णांचे प्रत्यक्ष वास्तव्य वेगळीकडे असू शकते. जिल्हा/मनपांनी उपलब्ध करून दिलेल्या पत्त्यानुसार रुग्णसंख्येत बदल झालेला आहे. चंद्रपूर मनपातील रुग्ण हे परदेशात संसर्गग्रस्त झालेले आहेत. आज मुंबई मनपा क्षेत्रात प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या १७ एप्रिलपासूनच्या अहवालातील रुग्णांचा समावेश करण्यात आलेला आहे.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतीयोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ४३२ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ६६११ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी २६.८९ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

Last Updated : Apr 21, 2020, 10:13 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details