महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत बाधितांचा दर घसरला, इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सचा अहवाल - mumbai corona death rate decreased

मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. यानंतर कोरोनाचा प्रसार झपाट्याने झाल्याने मुंबईत लॉकडाऊन लावण्यात आला होता. कोरोनाचा प्रसार व रुग्णसंख्या कमी झाल्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू करत निर्बंध शिथिल केले जात आहेत.

corona positive rate decreased institute of mathematical science reports
मुंबईत बाधिताचा दर घसरला

By

Published : Oct 20, 2021, 12:10 AM IST

मुंबई - गेले दीड वर्ष मुंबईत कोरोनाचा प्रसार आहे. हा कोरोनाचा प्रसार कमी झाला आहे. नव्याने आढळून येणारी रुग्णसंख्या आटोक्यात आहे. एका रुग्णापासून दुसऱ्या रुग्णाला बाधित करण्याचा दर एकापेक्षा खाली घसरून ०.९४पर्यंत खाली आला आहे. ऑक्टोबरच्या पंधरवड्यात कोरोनाची लागण सर्वाधिक खाली आल्याचे सर्वेक्षण चेन्नईच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सने आपल्या अहवालात जाहीर केले आहे.

कोरोना आटोक्यात -

मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. यानंतर कोरोनाचा प्रसार झपाट्याने झाल्याने मुंबईत लॉकडाऊन लावण्यात आला होता. कोरोनाचा प्रसार व रुग्णसंख्या कमी झाल्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू करत निर्बंध शिथिल केले जात आहेत. मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संशयित व रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांच्या चाचण्या केल्या जातात. एका रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 15 ते 20 लोकांना शोधून त्यांना क्वारेंटाईन केले जात आहे. त्यांच्या वेळीच चाचण्या करून वेळीच उपचार केले जात आहेत. यामुळे एप्रिल, मे महिन्यात दहा ते अकरा हजारावर गेलेली रुग्णसंख्या ४००च्या घरात आली आहे.

आरव्हॅल्यु घटला -

एका रुग्णापासून किती जण बाधित होतात. यावरून विषाणूच्या प्रसाराचे प्रमाण ठरवले जाते. याला रिप्रॉडक्शन नंबर असेही म्हटले जाते. हा दर एकपेक्षा जास्त असेल तर कोणाचा प्रसार वेगाने होत असल्याचे मानले जाते. तर हा दर एकापेक्षा कमी असल्यास आजार आटोक्यात असल्याचे मानले जाते. २८ ते ३० सप्टेंबरमध्ये मुंबईचा आर व्हॅल्यू १.०३ टक्के इतका होता. १० ते १२ ऑक्टोबर रोजी हा व्हॅल्यू १.०१ टक्के इतका होता. १३ आणि १५ ऑक्टोबरदरम्यान हा व्हॅल्यू १.०५ टक्के इतका होता. १६ ते १८ ऑक्टोबर दरम्यान हा व्हॅल्यू ०.९४ टक्के इतका नोंदवण्यात आला.

हेही वाचा -Corona Update : दिवसभरात 1,638 नवे रुग्ण तर २ हजार ७९१ रुग्णांची करोनावर मात; रिकव्हरी रेट ९७.४२ टक्के

७ लाख ५१ हजार नागरिकांना कोरोना -

मुंबईत मार्च २०२०पासून गेल्या दीड वर्षात ७ लाख ५१ हजार ४९४ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामधील ७ लाख २८ हजार १३८ नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. १६ हजार १८८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या ४ हजार ६५० सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १२८० दिवस आहे. मुंबईत झोपडपट्टी विभागात रुग्ण आढळून येत नसल्याने एकही झोपडपट्टी कंटेंटमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेली नाही. कोरोना रुग्ण आढळून आल्याने ४६ इमारती सील करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा -कोरोनाचे नियम पाळून चित्रपट आणि नाट्यगृहे सुरू होतील - मेघराज राजेभोसले

ABOUT THE AUTHOR

...view details