महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक : सेव्हन हिल रुग्णालयात कोरोनाबाधिताची आत्महत्या; कारण अस्पष्ट - मुंबई कोरोना न्यूज

मुंबईच्या अंधेरी मरोळ येथील सेव्हन हिल रुग्णालयात कोरोना झाल्याने दाखल झालेल्या एका रुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. सदर रुग्ण 60 वर्षीय असून त्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.

धक्कादायक : सेव्हन हिल रुग्णालयात कोरोनाबाधिताची आत्महत्या; कारण अस्पष्ट
धक्कादायक : सेव्हन हिल रुग्णालयात कोरोनाबाधिताची आत्महत्या; कारण अस्पष्ट

By

Published : May 9, 2020, 4:43 PM IST

मुंबई - मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनाचे रुग्ण पळून जाण्याचे प्रकार मुंबईत घडले आहेत. त्यातच आता कोरोनाच्या एका रुग्णाने सेव्हन हिल रुग्णालयात आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. मुंबईत कोरोनाबाधित रुग्णाची ही पहिलीच आत्महत्या आहे.

मुंबईमध्ये कोरोनाचे 12 हजार रुग्ण आहेत. रोज कोरोनाचे शेकडो रुग्ण नव्याने आढळून येत आहेत. कामा रुग्णालयातून कोरोनाचा एक रुग्ण पळून गेल्याने त्याबाबत आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायन रुग्णालयातून खिडकीतून पळून जाणाऱ्या रुग्णाला पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी पकडून पुन्हा वॉर्डमध्ये भरती केले होते. हे प्रकरण ताजे असतानाच मुंबईच्या अंधेरी मरोळ येथील सेव्हन हिल रुग्णालयात कोरोना झाल्याने दाखल झालेल्या एका रुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. सदर रुग्ण 60 वर्षीय असून त्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांच्या आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details