महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Corona BF7 Variant : मुंबई विमानतळावर आढळून आला कोरोना पॉजीटिव्ह प्रवासी, नमुने एनआयव्हीकडे - Corona positive passenger

जगभरात पुन्हा एकदा ( Spread of corona virus around the world ) कोरोनाच्या बीएफ ७ व्हेरियंटने कहर ( Corona BF7 Variant ) केला आहे. चीनमध्ये कोरोनाच्या ( Corona in China ) वाढत्या रुग्णांमुळे परिस्थिती अनियंत्रित आहे. याशिवाय भारत अमेरिका, जपान, ब्रिटन, दक्षिण कोरियामध्येही कोरोनाने जोर पकडला आहे.

Corona
कोरोना

By

Published : Dec 29, 2022, 10:36 PM IST

मुंबई -कोरोनाच्या बीएफ ७ व्हेरियंटमुळे ( Corona BF7 Variant ) जगभरात कोरोना विषाणूचा पुन्हा एकदा प्रसार वाढला ( Spread of corona virus around the world ) आहे. बीएफ ७ व्हेरियंटचा प्रसार मुंबईत होऊ नये म्हणून मुंबई पालिका ( Mumbai Municipality ) अलर्ट झाली आहे. कोरोना प्रसार झालेल्या देशातून मुंबई विमानतळावर ( Mumbai Airport ) येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट केली जात आहे. गेल्या दोन दिवसात ७४५ प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट केली असता त्यात एक प्रवासी कोरोना पॉजीटिव्ह आढळून आला आहे. त्याचे नमुने पुण्याच्या एन आय व्ही प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत.

विमानतळावर कोरोना पॉजीटिव्ह प्रवासी

विमानतळावर चाचण्या - मुंबईत मार्च २०२० पासून कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाला. हा प्रसार अडीच वर्षानंतर काहीसा कमी झाला आहे. त्यातच आता चीन, जपान, कोरिया, अमेरिका, ब्राझिल या देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा प्रसार झाला आहे. यामुळे या देशातून मुंबई विमानतळावर म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येत आहे.

एक प्रवासी कोरोना पॉजीटिव्ह -२७ व २८ डिसेंबर या दोन दिवसात विमानतळावर १९८ विमानांनी एकूण ३४ हजार ५०३ प्रवासी आले. त्यामधील ७४५ प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. त्यापैकी ७०८ प्रवाशांचा रिपोर्ट आला असून त्यापैकी एक प्रवासी कोरोना पॉजीटिव्ह आढळून आला आहे. त्याचे नमुने पुण्याच्या एन आय व्ही प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. त्याचा आहवाल आल्यावर या प्रवाशाला बीएफ ७ व्हेरियंटची लागण झाली आहे का हे स्पष्ट होणार आहे अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

अशा झाल्या चाचण्या - मुंबई विमानतळावर काल २७ डिसेंबर रोजी १७,५१० प्रवासी आले. त्यामधील ३६८ प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्या. त्यापैकी ३५८ जणांचा रिपोर्ट आला असून एकही प्रवासी कोरोना बाधित आढळून आलेला नाही. आज २८ डिसेंबर रोजी १६,९९३ प्रवासी आले असून ३७७ प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. त्यापैकी ३५० प्रवाशांचा अहवाल आला असून त्यात १ प्रवासी कोरोना पॉजीटिव्ह आढळून आलेला नाही.

भारतातही कोरोनाची चौथी लाट -कोरोनाचे दिवसेंदिवस वाढत चाललेले रुग्ण पाहता भारतातही कोरोनाची चौथी लाट येईल की काय अशी भीती लोकांना वाटत आहे. चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या Omicron चे BF.7 प्रकार भारतात सापडल्यानंतर ही चर्चा अधिक तीव्र झाली आहे. आरोग्य मंत्रालयाशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, जानेवारी महिन्यात भारतात कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढू शकतात. पुढील 40-45 दिवस खूप महत्वाचे असतील. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जेव्हा चीनमध्ये कोरोनाची लाट येते, तेव्हा जवळपास 40 दिवसांनी भारतातही कोविड प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.

प्रवाशांसाठी RT-PCR चाचणी अनिवार्य -भारताने बुधवारी 1 जानेवारीपासून चीन, थायलंडसह इतर चार देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी RT-PCR चाचणी अनिवार्य केली आहे. 1 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून चीन, थायलंड, सिंगापूर, हाँगकाँग, जपान दक्षिण कोरिया प्रवास सुरू करण्यापूर्वी आर.टी. पीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. माहिती देताना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया म्हणाले की, प्रवासापूर्वी प्रवाशांना त्यांचा अहवाल हवाई सुविधा पोर्टलवर अपलोड करावा लागणार आहे.

विमानतळांवर केवळ सहा हजार चाचण्या -यापूर्वी, 24 डिसेंबर रोजी, भारत सरकारने विमानतळांवर येणाऱ्या प्रवाशांची कोविड चाचणी सुरू केली होती. भारताबाहेरून येणाऱ्या प्रवाशांपैकी दोन टक्के प्रवाशांची विमानतळावर चाचणी केली जात आहे. गेल्या तीन दिवसांत विमानतळांवर केवळ सहा हजार चाचण्या झाल्या आहेत. चीन इतर पूर्व आशियाई देशांमध्ये कोविड संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत. अशा स्थितीत जानेवारीमध्ये भारतात कोविडच्या दैनंदिन रुग्णांची संख्या वाढू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. बुधवारी भारतात कोविडच्या २६८ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर गेल्या आठवड्यातील सरासरी दररोज २०० प्रकरणे आहेत. सरकार संभाव्य कोविड संसर्गाचा सामना करण्यासाठी भारतानेही तयारी सुरू केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details