मुंबई-कोरोना संक्रमणावर मात करत जगापुढे 'धारावी पॅटर्न'चा नवा आदर्श ठेवणारे धारावीकर आता संपूर्ण मुंबईला कोरोना संकटातून वाचविण्यासाठी सज्ज झाले आहेत. धारावीच्या कामराज मेमोरियल शाळेत आज करोना होऊन बरे झालेल्या नागरिकांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी स्क्रिनिंग केले.
या अभियानातील प्राथमिक चाचणीतील निकषांमध्ये पात्र ठरणारे दाते. येत्या 27 जुलैला प्लाझ्मा दान करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनाचे (27 जुलै) औचित्य साधुन, खासदार राहुल शेवाळे यांच्या पुढाकाराने 'प्लाझ्मा दान संकल्प अभियानाचे आयोजन धारावीत करण्यात आले आहे. 27 जुलैपासून सुरू होणाऱ्या या अभियानात सहभागी होण्यासाठी, कोरोनामुक्त दात्यांच्या प्राथमिक चाचणीला आजपासून सुरुवात करण्यात आली.
डॉक्टर व पालिका प्रशासनाच्या तसेच खासदार राहुल शेवाळे यांच्या आवाहनाला उस्फुर्त प्रतिसाद देत धारावी आणि आसपासच्या परिसरातील सुमारे 500 कोरोनामुक्त रुग्णांनी प्लाझ्मा दानासाठी अनुकूलता दर्शविली आहे. सोशल डिस्टसिंगचे नियम पाळत यातील सुमारे 50 जणांची प्राथमिक चाचणी आज धारावीत पार पडली. या दात्यांमध्ये धारावीतील नागरिक, पोलीस अधिकारी, डॉक्टर्स आणि पक्ष कार्यकर्ते पदाधिकारी यांचा समावेश होता. यावेळी मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर, डॉ. अनिल पाचनेकर, धारावीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
धारावीच्या प्लाझ्मा दान संकल्प अभियानाला मोठा प्रतिसाद देत धारावीकरांनी पुन्हा एकदा मुंबईकरांची मने जिंकली आहेत. मुंबईतील ज्या कोरोनामुक्त बंधू- भगिनींना या अभियानात सामील होण्याची इच्छा असेल त्यांनी जवळच्या शिवसेना शाखेशी, किंवा 9321586566 या आमच्या हेल्पलाईन क्रमांकावर व पालिका प्रशासनाजवळ संपर्क साधावा, आवाहन खासदार राहुल शेवाळे यांनी केले आहे.
ईटीव्ही भारत विशेष: धारावीतील 500 कोरोनामुक्त करणार प्लाझ्मा दान - मुंबई कोरोना बातमी
डॉक्टर व पालिका प्रशासनाच्या तसेच खासदार राहुल शेवाळे यांच्या आवाहनाला उस्फुर्त प्रतिसाद देत धारावी आणि आसपासच्या परिसरातील सुमारे 500 कोरोनामुक्त रुग्णांनी प्लाझ्मा दानासाठी अनुकूलता दर्शविली आहे. फिजिकल डिस्टसिंगचे नियम पाळत यातील सुमारे 50 जणांची प्राथमिक चाचणी आज धारावीत पार पडली.
धारावीतील 500 कोरोनामुक्त करणार प्लाझ्मा दान...
18 ते 55 वर्षे वयाच्या ज्या नागरिकांनी कोरोनावर पूर्णपणे मात केली आहे आणि ज्यांचा कोरोना बरा होऊन कमीत-कमी 28 दिवस झाले आहेत, अशा दात्यांच्या रक्ताची प्राथमिक तपासणी प्रथम केली जाते. यामध्ये दात्याला कोणताही गंभीर आजार नाही ना, तसेच इतर निकषांची खात्री करुनच त्यांना प्लाझ्मा दान करण्याचा सल्ला धारावीत प्लाझ्मा दान अभियानात डॉक्टरांकडून दिला जातो.