महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीएमसीचा ऑक्सिजनबाबत दावा फोल; भगवतीनंतर भाभा रूग्णालयातील ३३ रूग्णांना हलवले - बीएमसी भाभा रूग्णालय ऑक्सिजन साठा बातमी

गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणांवरील ताण पुन्हा वाढला आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, पुरेसा ऑक्सिजन साठा शिल्लक असल्याचा दावा बीएमसीने केला होता.

BMC Bhabha hospital corona patients shifting news
बीएमसी भाभा रूग्णालय कोरोनाबाधित बातमी

By

Published : Apr 17, 2021, 9:50 AM IST

मुंबई -राजधानी मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोनाची रूग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेड्सची कमतरता भासत आहे. बीएमसीने ऑक्सिजनचा साठा असल्याचा दावा केला होता. मात्र, हा दावा फोल ठरला आहे. ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागल्याने अगोदर भगवती रूग्णालयातील २५ रुग्णांना इतर रूग्णालयात हलवण्यात आले. तर, आता वांद्रे येथील भाभा रूग्णालयातील ३३ रूग्णांनाही ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे बिकेसी कोविड सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे.

भगवतीनंतर भाभा रूग्णालयातील ३३ रूग्णांना इतरत्र हलवले

भगवतीमधील २५ रूग्णांना हलवले -

बोरिवली येथे महानगरपालिकेचे भगवती रूग्णालय आहे. या रूग्णालयात कोरोना रूग्णांवर उपचार केले जात होते. तेथील २५ रूग्णांना ऑक्सिजन लावण्यात आले होते. आज(शनिवार) अचानक ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागली. पालिकेने तातडीने १० रूग्णांना कांदिवली येथील शताब्दी रूग्णालयात तर इतर १५ रूग्णांना दहिसर येथील कोविड रूग्णालयात हलवले.

भाभामधील ३३ रूग्णांना हलवले -

वांद्रे पश्चिम येथे भगवती रूग्णालय आहे. या रूग्णालयात देखील कोरोना रूग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यातील ३३ रूग्णांना ऑक्सिजन लावण्यात आले होते. मात्र, रात्री अचानक ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागल्याने या रूग्णांना रात्रीच बिकेसी जम्बो कोविड सेंटरमध्ये हलवण्यात आले. यावरून महापालिकेने केलेला ऑक्सिजनचा साठ्याचा दावा फोल ठरला आहे.

महानगरपालिकेचा दावा -

मुंबईमध्ये गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार सुरू आहे. हा प्रसार रोखण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे. मात्र, रूग्णांची संख्या दररोज वाढत आहे. रूग्णांवर उपचार करताना ऑक्सिजन, रेमडेसीवीर इंजेक्शनची कमतरता भासणार नाही, असा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे. ऑक्सिजनचा पुरवठा करता यावा म्हणून एका ऐवजी तीन कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. रूग्णालय, कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन टॅंक उभारण्यात आले आहेत. तसेच २२ हजार रेमडेसीवीर इंजेक्शनचा साठा असून आणखी २ लाख इंजेक्शन मागवण्यात आल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.

सुरक्षेचा उपाय म्हणून रूग्णांना हलवले -

कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. पालिका रूग्णांना सोयी सुविधा देण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत आहे. ड्युरा सिलेंडर असलेल्या रूग्णालयात ऑक्सिजनचा साठा कमी आहे. जास्तीत जास्त रूग्णांचा जीव वाचवणे महत्त्वाचे आहे. यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून रूग्णांना इतर रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती आरोग्य समितीच्या अध्यक्षा राजुल पटेल यांनी दिली.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details