महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

COVID-19 : मुंबईतील 'त्या' रुग्णांच्या निकटवर्तीयांची चाचणी 'निगेटिव्ह' - मुंबई कोरोना बातमी

आतापर्यंत मुंबई विमानतळावरुन 190 जण संशयित आढळले होते. त्यापैकी 188 जणांच्या टेस्ट 'निगेटिव्ह' आल्या आहेत. यामुळे कोरोनाचा मुंबईत सध्या कोणताही नवा रुग्ण आढळला नसल्याची माहिती आरोग्य विभागाचे उप कार्यकारी अधिकारी शहा यांनी दिली.

corona-patients-relative-test-negative-in-mumbai
'त्या' रुग्णांच्या निकटवर्तीयांची चाचणी 'निगेटिव्ह'

By

Published : Mar 12, 2020, 9:35 PM IST

मुंबई- जगभरात थैमान घालत हजारो लोकांचा बळी घेणाऱ्या कोरोना व्हायरसचे दोन रुग्ण मुंबईत आढळले आहेत. या रुग्णांच्या घरातील तीन नातेवाईकांच्या रक्ताची चाचणी बुधवारी करण्यात आली. यात त्यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांना घरीच देखरेखीखाली राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आतापर्यंत मुंबई विमानतळावरुन 190 जण संशयित आढळले होते. त्यापैकी 188 जणांच्या टेस्ट 'निगेटिव्ह' आल्या आहेत. यामुळे कोरोनाचा मुंबईत सध्या कोणताही नवा रुग्ण आढळला नसल्याची माहिती आरोग्य विभागाचे उप कार्यकारी अधिकारी शहा यांनी दिली. मुंबईकरांनो काळजी घ्या, मात्र घाबरण्याची आवशक्यता नाही, असे आवाहनही पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले.

'त्या' रुग्णांच्या निकटवर्तीयांची चाचणी 'निगेटिव्ह'

हेही वाचा-नाथाभाऊंसाठी पक्षाने वेगळा प्लॅन आखला असेल - पंकजा मुंडे

मास्क लावण्याची गरज नाही -
सर्दी, खोकला, ताप आल्यावरच शिंकताना, खोकताना तोंडावर रुमालाचा वापर करावा. कोणतीही लक्षणे नसतील तर मास्क लावण्याची आवश्यकता नाही. रुमाल वेळच्यावेळी बदलावा. बाहेरच्या व्यक्ती किंवा वस्तूशी संपर्क आल्यास हात स्वच्छ धुवावेत. ज्यांना कोरोना झाला आहे, अशा रुग्णांना आणि त्यांच्या सहवासात असलेल्या लोकांनाच मास्क लावण्याची आवश्यकता आहे. इतरांना मास्कची गरज नाही.

संपर्कासाठी 1916 हेल्पलाईन -
सर्दी, खोकला, ताप आदी लक्षण आढळल्यास कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावे. आजाराबाबत व इतर आवश्यक माहितीसाठी पालिकेच्या 1916 या हेल्पलाईनवर संपर्क साधता येईल. येथे तज्ज्ञ डॉक्टरांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

आरोग्य विभागाकडून करण्यात आलेल्या उपाययोजना-
- कस्तुरबा रुग्णालयात विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. 28 खाटांची संख्या आता 50 करण्यात आली आहे. त्या 100 पर्यंत वाढवल्या जाणार आहेत.
- कस्तुरबा रुग्णालयात ओपीडी सुरू करण्यात आली आहे. तपासणी सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे.
- महापालिकीची चार मोठी रुग्णालये, सरकारी व खासगी रुग्णालयातही विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहेत.
- मरोळ, अंधेरी येथील सेव्हन हिल रुग्णालय येथे अशा रुग्णांसाठी विशेष कक्ष सुरू करुन देखभाल केली जाते आहे.
- डॉक्टर्स, परिचारिका व पूरक कर्मचारीवर्ग यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
- परदेशातून विमानतळावर येणाऱ्या 1 लाख 96 हजार 762 पर्यटकांची आतापर्यंत तपासणी करण्यात आली.
- विमानतळावर तपासणी करण्यासाठी 45 डॉक्टर, 15 पॅरामेडिकल स्टाफ 24 तास नियुक्त करण्यात आले आहेत. तीन पाळ्यात ते काम करतात. आंतरराष्ट्रीय पर्यटकांवर दैनंदिनी देखरेख ठेवली जाते आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details