मुंबई- मंत्रालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या यशोधन इमारतीत २८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या इमारतीत सनदी अधिकारी राहतात. अचानक इतक्या मोठ्या संख्येत कोरोनाबाधित सापडल्याने अधिकाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
यशोधन इमारत चर्चगेट परिसरात आहे. या इमारतीमध्ये सनदी अधिकारी राहतात. या इमारतीत काही दिवसांपूर्वी ३ जण पॉझिटिव्ह आढळले होते. त्यापैकी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव संजय मुखर्जी यांच्या चालकाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे येथील सर्व अधिकाऱ्यांच्या चालक, कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ९० जणांपैकी २८ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.