महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईमधील कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढला... - मुंबई बातमी

मुंबईमधील खार येथील एच पूर्व विभागामध्ये रुग्ण दुप्पट व्हायला 64 दिवस लागले आहेत. तेथील रुग्ण वाढीचा सरासरी दर 1.1 टक्के इतका आहे. दादर माटुंगा येथील एफ उत्तर विभागामध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून आता तब्बल 62 दिवसांवर पोहोचला आहे. रुग्ण वाढीचे प्रमाण 1.1 टक्के असे सर्वात कमी आहे.

corona-patient-doubling-rate-increase-in-mumbai
मुंबईमधील कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढला...

By

Published : Jun 19, 2020, 3:09 AM IST

मुंबई- मुंबईत कोरोना विषाणूचे रुग्ण मोठ्याप्रमाणात आढळून येत असताना, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून आता 30 दिवसांवर गेला आहे. तर रुग्ण वाढीचा सरासरी दर आणखी कमी होऊन आता 2.30 टक्क्यांवर पोहोचला आहे. दहिसर येथील आर नॉर्थ विभागात रुग्ण वाढीचा दर 13 दिवस तर बोरिवली येथील आर सेंट्रल विभागात रुग्ण वाढीचा दर 16 दिवस इतका आहे. या विभागात रुग्ण वाढ अधिक गतीने होत असल्याची आकडेवारी पालिकेच्या आरोग्य विभागाने प्रसिद्ध केली आहे.

मुंबईमधील खार येथील एच पूर्व विभागामध्ये रुग्ण दुप्पट व्हायला 64 दिवस लागले आहेत. तेथील रुग्ण वाढीचा सरासरी दर 1.1 टक्के इतका आहे. दादर माटुंगा येथील एफ उत्तर विभागामध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून आता तब्बल 62 दिवसांवर पोहोचला आहे. रुग्ण वाढीचे प्रमाण 1.1 टक्के असे सर्वात कमी आहे. तर चेंबूर पूर्व येथील एम पूर्व विभागामध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 56 दिवस इतका आहे. तर रुग्ण वाढीचा सरासरी दर 1.2 टक्के, कुर्ला येथील एल विभागामध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 53 दिवस इतका असून रुग्ण वाढीचा सरासरी दर 1.3 टक्के इतका आहे. तर भायखळा येथील ई विभागामध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 51 दिवस इतका असून रुग्ण वाढीचा सरासरी दर 1.4 टक्के इतका आहे.

मुंबईमध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 62799 वर पोहोचला आहे. तर मृतांचा आकडा 3309 वर पोहोचला आहे. मुंबईमधून आतापर्यंत 31856 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे मुंबईत सध्या कोरोनाचे 27634 अॅक्टीव्ह रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details