महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...तर जहाजातही क्वारंटाइन कक्ष, बीपीटीच्या तीन इमारतीही एक हजार बेडसह उपलब्ध - गर्दीमुळे कोरोना प्रसाराची भीती

कोरोनाग्रस्त आणि संशयित रुग्णांच्या संपर्कात नागरिक मोठ्या संख्येने येत असल्याने संभाव्य रुग्णांचीही संख्या मुंबईत वाढत आहे. त्यामुळे या संभाव्य रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी जागेची गरज भासत आहे. त्यामुळेच आता रिकामी घरे, कार्यालये, समाज मंदिरे, शाळा यांच्या पाठोपाठ तरंगत्या जहाजाचाही पर्याय पुढे आला आहे.

जहाजातही क्वारंटाइन कक्ष
जहाजातही क्वारंटाइन कक्ष

By

Published : Apr 5, 2020, 11:10 AM IST

मुंबई - राजधानी मुंबईतील वाढत्या संभाव्य कोरोना रुग्णांना येत्या काळात समुद्रात तरंगत्या जहाजात क्वारंटाईन करण्यात येण्याची शक्यता आहे. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आणि क्वारंटाईन रुग्णांसाठी जागा अपुरी पडली तर, जहाज क्वारंटाईनसाठी उपलब्ध करून देण्यासाठी सज्ज असल्याची माहिती मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी 'ई टीव्ही भारत'ला दिली. याआधीच 1 हजार बेडच्या तीन इमारतीही उपलब्ध करून देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

कोरोनाग्रस्त आणि संशयित रुग्णांच्या संपर्कात नागरिक मोठ्या संख्येने येत असल्याने संभाव्य रुग्णांचीही संख्या मुंबईत वाढत आहे. त्यामुळे या संभाव्य रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी जागेची गरज भासत आहे. त्यामुळेच आता रिकामी घरे, कार्यालये, समाज मंदिरे, शाळा यांच्या पाठोपाठ तरंगत्या जहाजाचाही पर्याय पुढे आला आहे. इटलीमध्ये जहाजात हॉस्पिटल तयार करून रुग्णांवर उपचार केले जात आहेत. याच धर्तीवर क्वारंटाईनसाठी जहाज उपलब्ध करून देण्याची तयारी बीपीटीने दाखवली आहे. तरंगत्या जहाजात 1 हजार जणांना क्वारंटाईन करता येणार असल्याचेही भाटिया यांनी सांगितले आहे.


वडाळा येथील बीपीटीच्या तीन इमारतीही क्वारंटाईनसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात 1 हजार जणांना क्वारंटाईन करता येणार आहे. त्याचबरोबर वडाळा बीपीटी येथील रुग्णालयातील 90 टक्के जागा आयसोलेशनसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर, बीपीटीमध्ये एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यानंतर या परिसरात योग्य ती काळजी घेतली जात आहे. निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे असेही भाटिया यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details