मुंबई - मुंबईत गेल्या अकरा महिन्यात केलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्यात आला होता. मुंबईत 300 ते 400 रुग्ण आढळून येत होते मात्र एक महिन्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. 14 फेब्रुवारीला 645, 15 फेब्रुवारीला 493, 16 फेब्रुवारीला 461, 17 फेब्रुवारीला 721, 18 फेब्रुवारीला 736, 19 फेब्रुवारीला 823 तर आज 897 नवे रुग्ण आढळून आले आहेत. रुग्ण संख्या वाढल्याने मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
कोरोना रुग्णांची आकडेवारी
मुंबईत शनिवारी 897 रुग्ण आढळल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 18 हजार 207 वर पोहचला आहे. आज 3 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11 हजार 438 वर पोहचला आहे. 471 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 2 लाख 99 हजार 006 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 6900 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 371 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळलेल्या 93 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 1305 इमारतीत रुग्ण आढळल्याने त्या सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 31 लाख 17 हजार 294 चाचण्या करण्यात आल्या असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
हे विभाग हॉटस्पॉट
मुंबईत बोरिवली, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर, टिळक नगर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. या विभागात कोरोनाचे नियम पाळावेत म्हणून सोसायट्यांना पालिकेने नोटीस बजावल्या आहेत.
रुग्णसंख्या वाढली