महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Omicron in Maharashtra : राज्यात एकूण ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 20; कुठे किती रुग्ण? - महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे रुग्ण कुठे आढळले

या २० ओमायक्रॉन रुग्णांपैकी ९ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 13 डिसेंबरला आढळलेल्या ओमायक्रॉनबाधित दोन्ही रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. पुण्यातील रुग्ण ३९ वर्षाची महिला आहे, तर लातूरमधील रुग्ण ३३ वर्षाचा पुरुष आहे. सध्या दोघेही विलगीकरणात आहेत. या रुग्णांच्या प्रत्येकी ३ संपर्कात आलेल्यांची चाचणी करण्यात आली. त्यांचे कोविड रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

omicron file photo
ओमायक्रॉन फाईल फोटो

By

Published : Dec 14, 2021, 3:39 PM IST

Updated : Dec 14, 2021, 5:13 PM IST

मुंबई - डेल्टा व्हेरियंटनंतर आता राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण (Omicron in Maharashtra) आढळून येत आहेत. राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या २० वर पोहचली (Total Omicron cases in State) आहे. यात मुंबईत ५, पिंपरी चिंचवडमध्ये १०, पुणे मनपा क्षेत्रात २, कल्याण डोंबिवलीत १, नागपूरमध्ये १ आणि लातूरमध्ये १ रूग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, कोरोना नियमांचे पालन करा व भीती बाळगू नका, असे आवाहन आरोग्य विभागाकडून नागरिकांना करण्यात येत आहे.

  • ९ रुग्णांना डिस्चार्ज -

या २० ओमायक्रॉन रुग्णांपैकी ९ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 13 डिसेंबरला आढळलेल्या ओमायक्रॉनबाधित दोन्ही रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. पुण्यातील रुग्ण ३९ वर्षाची महिला आहे, तर लातूरमधील रुग्ण ३३ वर्षाचा पुरुष आहे. सध्या दोघेही विलगीकरणात आहेत. या रुग्णांच्या प्रत्येकी ३ संपर्कात आलेल्यांची चाचणी करण्यात आली. त्यांचे कोविड रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

  • राज्यात या भागात आढळले ओमायक्रॉन रुग्ण -

मुंबई - ५

पिंपरी चिंचवड - १०

पुणे मनपा क्षेत्र - २

कल्याण डोंबिवली - १

नागपूर - १

लातूर - १

इंग्लंडमध्ये ओमायक्रॉनचा जगातील पहिला मृत्यू

ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे जगात ( First Omicron Death ) पहिला बळी गेला आहे. हा मृृत्यू झाल्याची माहिती इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी ( British Prime Minister on Omicron Death In UK ) दिली आहे. दक्षिण आफ्रिकेत ( South Africa Omicron Variant In Maharashtra ) आढळलेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हॅरिएन्टची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. या विषाणूविषयी WHO ने 26 नोव्हेंबर रोजी काही माहिती जारी केली. त्यानुसार या व्हॅरिएन्टला WHO ने व्हायरस ऑफ कन्सर्न ( WHO Virus Of Concern ) म्हणजेच काळजी करण्याजोगा विषाणू ठरविले आहे.

घाबरण्याची आवश्यकता नाही, मात्र काळजी घ्यावी -

ओमायक्रॉन हा कोरोनाच नवा व्हेरिएंट (Omicron Variant in Maharashtra ) आहे. यामध्ये बरेच बदल झालेले आहेत. ओमायक्रॉन हा नवा व्हेरिएंट वीस ते पंचवीस दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेत (Omicron Found From South Africa) आढळून आला. या व्हेरिएंटचा प्रसार फार झपाट्याने होतो आहे. असे असले तरी यामुळे कोणाचा मृत्यू वगैरे होण्याची भीती नाही. हे आतापर्यंतच्या अभ्यासात तरी आढळून आलेले आहे. मात्र, प्रत्येकाने काळजी बाळगणे गरजेचे असल्याचेही डॉ. जयंत पांढरीकर (Dr Jayant Pandharikar on Omicron ) यांनी स्पष्ट केले.

Last Updated : Dec 14, 2021, 5:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details