प्रतिक्रिया देताना अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे मुंबई : देशात कोरोना बाधितांची संख्या सुमारे 32 हजारवर पोहचली आहे. मागील 24 तासात महाराष्ट्रातील नव्या 778 रुग्णांची भर पडली आहे. राज्यात सध्या चार हजार संशयित रुग्ण सक्रिय आहेत. देशातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत केंद्र सरकारने काही राज्यांमध्ये मास्क सक्ती केली आहे. कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी दर सोमवार आणि मंगळवारी देशभरातील शासकीय, खासगी रुग्णालयात मॉकड्रील करण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णालयातील अतिदक्षता विभाग ऑक्सिजन सिलेंडर, औषध, मास्क, डॉक्टर-कर्मचारी वर्ग, अतिमहत्त्वाच्या आणि गरजेच्या वस्तू, आरोग्य सेवेची गुणवत्ता ऑक्सिजन पुरवठ्याची चाचपणी याचा यातून आढावा घेतला जातो आहे.
ट्रेनिंग देणे गरजेचे :आज मुंबईतील जे जे रुग्णालयात सकाळी 11 वाजता मॉकड्रील करण्यात आले. दुपारी 1 वाजता बॉम्बे रुग्णालयात मॉकड्रील केले जाणार असल्याची माहिती जे जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली. आज जेजे हॉस्पिटलमध्ये मॉकड्रील करत आहोत. त्यांनी ओपीडीपासून ॲम्बुलन्समधून पेशंट आल्यापासून त्याची टेस्टिंग कशी करायची, रिपोर्ट पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आल्यावर पुढे काय करायचे? हे सगळ्यांसाठीच रिफ्रेशरसारखे आहे. आम्ही तीन वर्षांपूर्वी मॉकड्रील केले होते. 2020 मध्ये शासकीय हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स बदलत असतात, निवासी डॉक्टर तीन वर्षात पास होऊन निघून जातात. नवे डॉक्टर्स येतात. काहींनी कोविडमध्ये काम केले, काहींनी केलेले नाही. त्यामुळे सगळ्यांसाठीच हे नव्याने ट्रेनिंग देणे गरजेचे असल्याचे अधिष्ठाता डॉ. सापळे म्हणाल्या.
कोरोनाला प्रतिबंध घालणे उद्देश :राज्यात गेल्या चार महिन्यापूर्वी झिरो केसेस होत्या. त्यामुळे काहींनी त्याचे ट्रेनिंगच घेतले नसेल म्हणून आपण आज मॉकड्रील केले. केसेस वाढू नये, असे प्रत्येकालाच वाटते. आपण प्रयत्न करत आहोत. परंतु, जेव्हा केसेस वाढतील तेव्हा आपण हे ट्रेनिंग करू शकत नाही. एवढ्या गर्दीत आपण तेव्हा इथे राहूच शकत नाही. त्यामुळे जेवढे तुम्ही ट्रेनिंग कराल जेवढे फाईन ट्यून कराल, तेवढे पुढे प्रॉब्लेम होणार नाहीत. यादृष्टीने हे मॉकड्रील घेणे गरजेचे होते. आता रुग्ण संख्या कशी रोखायची, नक्की काय करायचे, हॉस्पिटलमध्ये कुठे आधी घेऊन यायचे, याबाबतचे मार्गदर्शन सगळ्यांनाच मिळून जाईल. कोरोनाला प्रतिबंध घालणे हा एकमेव उद्देश असल्याचे डॉ. सापळे यांनी स्पष्ट केले.
चार प्रमुख रुग्णालय : जे जे हॉस्पिटल, सेंट जॉर्ज हॉस्पिटल, कामा हॉस्पिटल, जी टी हॉस्पिटल चार प्रमुख रुग्णालय आहेत. कोविड वाढल्यावर कोविडचा इलाज होतो. मात्र जे नॉन कोविड आजार आहेत. त्यामध्ये डायलेसिस, हार्ट अटॅक आला तर अंजॉग्राफी - एन्जोप्लास्टी करावी लागते. एक्सीडेंट झाला तर ब्रेन सर्जरी करावी लागते. आमच्याकडे पाच हॉस्पिटलपैकी सेंट जॉर्ज हे पहिले कोविड हॉस्पिटल आहे. महिला, पुरूषांकरिता आयसीयू केअर आणि लहान मुले यांच्यासाठी सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये पूर्ण सोय आहे. दीडशेपर्यंत त्यांची कॅपॅसिटी आहे. सध्या येथे पाच रुग्ण आहेत. ते वाढल्यावर आम्ही जीटी हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णालय सुरू करू. कामा हॉस्पिटल महिलांसाठी असल्याने सगळ्या महिलांवर त्या ठिकाणी उपचार केले जातील.
आवश्यकता असल्यास कोविड सेंटर :आवश्यकता असल्यास जे जे रुग्णालयात कोविड सेंटर उभारले जाईल. स्क्रीनिंग आणि क्रिटिकल रुग्णांसाठी उपचार करण्यात येतील. त्यानंतर रुग्णाला सेंट जॉर्जमध्ये दाखल करण्याचे नियोजन आहे. ही वेळ येऊ नये, यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला हवेत. पाच रुग्णालय मिळून एकूण 3 हजार बेड आहेत. कोविड आणि नॉन कोविड रुग्णांकडे दुर्लक्ष होणार नाही, याची पूर्णता दखल घेऊ, असे अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे यांनी सांगितले.
हेही वाचा : MH Covid Update : देशभरात आज कोरोना रुग्णालयांत मॉक ड्रील, राज्यात 'या' आठ जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण