महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 13, 2021, 7:15 AM IST

Updated : Jun 13, 2021, 4:55 PM IST

ETV Bharat / state

राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..

कोरोना अपडेट
corona update

16:53 June 13

भंडारा जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येमध्ये घट

भंडारा - जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येमध्ये घट झाली असल्याने जिल्हा पहिल्या टप्प्यात आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या नवीन आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरू ठेवता येणार आहे. 7 जूनला भंडारा जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा दर 7. 43 टक्के होता, तो कमी होऊन 13 जून रोजी 1. 59 टक्के एवढा राहिला आहे. जिल्हा अनलॉक झाला असला, तरी जिल्ह्यातील जमावबंदी आणि संचारबंदी कायम राहणार आहे.

09:39 June 13

देशातील कोरोनाची सद्यस्थिती -

एकूण रुग्णसंख्या -2,94,39,989 

एकूण बरे झालेले रुग्ण -2,80,43,446 

एकूण मृत्यू -3,70,384 

एकूण सक्रिय रुग्णसंख्या - 10,26,159 

एकूण लसीकरण -25,31,95,048

09:33 June 13

देशात मागील 24 तासांत 80,834 नविन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तसेच 1,32,062 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 3,303 बाधितांचा मृत्यू झाला, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. 

07:13 June 13

रत्नागिरीत शनिवारी आढळले ४२६ नवे कोरोनाबाधित, १२ जणांच्या मृत्यूची नोंद

रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या कडक लॉकडाऊनच्या नंतर सलग तिसऱ्या दिवशी शनिवारी जिल्ह्यात ४२६ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या लॉकडाऊनचा कोणताच परिणाम रुग्ण संख्या रोखण्यासाठी झालेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तर शनिवारी १२ आणि गेल्या काही दिवसात १६ जणांचा असे २८ जणांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा रुग्णालयाने शनिवारी जाहीर केले आहे. त्यामुळे एकूण मृत्यूच्या संख्येने १५०१ ची संख्या गाठली आहे.
 

06:56 June 13

मुंबईत गेल्या वर्षी मार्चपासून कोरोना विषाणुचा संसर्ग सुरू झाला. यावर्षी जानेवारी, फेब्रुवारीपासून कोरोनाचा प्रसार कमी झाला. यामुळे मुंबईमधील लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात शिथिलता देण्यात आली. याचा परिणाम गर्दी वाढल्याने कोरोनाचा पुन्हा प्रसार वाढला. मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आली. मुंबईत 7 ते 11 हजारापर्यंत रोज रुग्ण आढळून आले. यामुळे मुंबईचा पॉझिटिव्हीटी रेट 10 टक्क्यांच्या पुढे गेला होता.

06:42 June 13

मुंबई -कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. कोरोनाबाधित रुग्णसंख्याही कमी झाली आहे. यामुळे मुंबईमधील पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला आहे. मुंबईत ५.२५ टक्के इतका पॉझिटिव्हीटी रेट होता. एकाच आठवड्यात तो ४.४० टक्के इतका झाला आहे. रुग्णसंख्या कमी झाल्याने मुंबईकरांना काहिसा दिलासा मिळाला आहे.

Last Updated : Jun 13, 2021, 4:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details