मुंबई - शहरात कोरोना विषाणूचा प्रसार वाढतच आहे. डॉक्टर, पारिचारिका, पोलीस, माध्यम कर्मचारी यांनाही कोरोनाची लागण झाली असताना आता दक्षिण मुंबईतील पंचतारांकित ताज पॅलेस हॉटेलमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. ताज हॉटेलमधील ६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांवर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबईच्या ताज हॉटेलमधील 6 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण - corona mumbai
ताज पॅलेसमधील सहा कर्मचाऱ्यांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या सर्वांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात असलेल्या इतर कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच ताज हॉटेलमध्ये औषध फवारणी केली जात आहे.

मुंबईमध्ये आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टर, पारिचारिका यांना ताज हॉटेलकडून राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ताजमधील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने या आरोग्य कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण होण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, सुदैवाने आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे समजते.