मुंबई - शहराचा रस्ता असो वा जिल्ह्याची बाजारपेठ सगळीकडे आपल्याला एक गोष्ट सारखी दिसते. ती म्हणजे मोठा मोठ्या लक्झरी गाड्या. काही लक्झरी गाड्या ह्या खाजगी असतात , काही व्यावसायिक कारणासाठी वापरल्या जातात. मुंबई पुणे ह्यांसारख्या शहरात लक्झरी गाड्यांचा व्यवसाय हा मोठा प्रमाणात आहे. खाजगी टूर्स असो वां लग्नाचे समारंभ लक्झरी गाड्या ह्या आवडीने वापरल्या जातात. खाजगी असो वा व्यावसायिक एकंदरीत गाड्यांचा वापर जोरात असतो. मात्र कोरोनाचा फटका ह्या लक्सरी गाड्यांचा व्यवसाय करणाऱ्यांनाही बसला आहे.
आर्थिक कंबरडे मोडले
कोरोनामुळे लोकडाऊन लागले आणि सर्व व्यवहार ठप्प झाले. लग्नसराई असो वा टुरिजम असो लक्झरी गाड्याचा व्यवसाय नियमितपणे चालतो. परंतु टाळेबंदी शिथिलीकरणानंतरही हा व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यांना दैनंदिन गरजा भागवणे कठीण झाले आहेत. लक्झरी गाड्यांचा व्यवसाय सध्या एक तोट्याचा व्यवसाय ठरत आहे. कोरोनामुळे लक्झरी गाड्यांचा व्यवसाय हा जवळजवळ ८०% कमी झाला आहे. फक्त २०% उत्पन्न व्यायवसायिकांना मिळत आहे. त्यात डिझेल आणि पेट्रोल ह्यांचे वाढणारे दर लक्झरी गाड्यांचा व्यवसाय करणाऱ्यांना अजून संकटात टाकत आहे. आधीच आर्थिक कंबरडे मोडले असल्याने आणि दुसरीकडे खचलेला व्यवसाय ह्यामुळे कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी सुध्दा उत्पन्न मिळत नसल्याचे व्यावसायिकांचे मत आहे.