महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maharashtra Corona Update : राज्यात रविवारी 2186 नवे कोरोनाबाधित; तिघांचा मृत्चू - today maharashtra corona cases

राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत चढउतार (Maharashtra Corona Update) होताना दिसत आहे. आज(17 जुलै) राज्यात 2 हजार 186 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून आले (New Corona Cases in Maharashtra) आहेत. तर 2 हजार 179 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

corona file photo
कोरोना फाईल फोटो

By

Published : Jul 17, 2022, 7:53 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत चढउतार (Maharashtra Corona Update) होताना दिसत आहे. आज(17 जुलै) राज्यात 2 हजार 186 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून आले (New Corona Cases in Maharashtra) आहेत. तर 2 हजार 179 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर राज्यात आज 3 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 15 हजार 525 रुग्ण सक्रिय आहेत. राज्यात आज BA.4 व्हेरियंटचा एक रुग्ण आढळून आला आहे. तर BA.5 व्हेरियंटचे 18 रुग्ण आज राज्यात आढळले आहेत.

कोरोना प्रतिबंधक लशीची वर्धक मात्रा मोफत देण्याचा केंद्राचा निर्णय -मुंबईमध्ये मार्च २०२० पासून कोरोना विषाणूचा प्रसार सुरु झाला. हा प्रसार रोखण्यासाठी १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण मोहीम राबवण्यात आली. मुंबईमधील ९२ लाख ३६ हजार ५०० नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ठ देण्यात आले होते. त्यापैकी गेल्या दीड वर्षात मुंबई महानगरपालिकेने लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसचे उद्दिष्ट पार केले आहे. मात्र ९ लाख ९२ हजार १७७ लाभार्थ्यांना बूस्टर डोस देता आला आहे. ( Corona vaccine ) यामुळे येत्या ७५ दिवसात मुंबईमधील ८२ लाख ४४ हजार ३२३ नागरिकांनी बूस्टर डोस देण्याचे आव्हान पालिकेसमोर असणार आहे. यावर केंद्र सरकारची गाईडलाईन आल्यावर बूस्टर डोस दिले जातील असे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

काय केलीय केंद्र सरकारने घोषणा - भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (७५ वर्ष) साजरा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने १५ जुलै पासून पुढील ७५ दिवस १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना बूस्टर डोस मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशी घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली आहे.

हेही वाचा -MLAs Suspension Petition Hearing : आमदार निलंबनाच्या याचिकेवर 20 जुलैला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

ABOUT THE AUTHOR

...view details