महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एसटी प्रवासात ज्येष्ठांसाठीच्या स्मार्ट-कार्ड सवलतीला एक महिना मुदतवाढ

बस स्थानकावरील अनावश्यक गर्दी कमी करण्याच्या हेतूने 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या एसटी स्मार्ट-कार्ड सवलतची मुदत 31 मार्च ऐवजी एक महिना वाढवून 30 एप्रिल अशी करण्यात आली आहे. त्यामुळे स्मार्टकार्ड घेणाऱ्या ज्येष्ठांनी या 31 मार्चपर्यंत स्मार्ट कार्ड घेण्यासाठी घाई गडबड करू नये, असे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे.

st bus smart card
एसटी बस

By

Published : Mar 19, 2020, 6:59 PM IST

मुंबई - करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या एसटी प्रवासाच्या सवलत स्मार्ट-कार्ड योजनेला एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली.

हेही वाचा...कोरोनाची आर्थिक झळ : इंडिगोकडून वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली एसटीने आपल्या प्रवाशांना व कर्मचाऱ्यांना संभाव्य संसर्ग होऊ नये म्हणून, विविध उपाय योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बस स्थानकावरील अनावश्यक गर्दी कमी करण्याच्या हेतूने 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या एसटीच्या सवलत स्मार्ट -कार्ड ची मुदत 31 मार्च ऐवजी एक महिना वाढवून 30 एप्रिल अशी करण्यात आली आहे. त्यामुळे स्मार्टकार्ड घेणाऱ्या ज्येष्ठांनी या 31 मार्चपर्यंत स्मार्ट कार्ड घेण्यासाठी घाई गडबड करू नये, असे आवाहन परब यांनी केले आहे.

सध्या एसटी महामंडळाच्या 250 आगारामध्ये तसेच महामंडळाने अधिकृतपणे नेमलेल्या खाजगी वितरकामार्फत ज्येष्ठ नागरिकांना आधार क्रमांकाशी संलग्न असलेली स्मार्ट कार्ड देण्यात येत आहेत. परंतु कोरोना विषाणूच्या संभाव्य संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आता या योजनेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली असून 1 एप्रिल नंतर उर्वरित ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड देण्याची आली आहे. तोपर्यंत जुन्या पद्धतीनुसारच ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details