मुंबई - राज्यात आणि मुंबईत कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव पाहता राज्य सरकार तसेच पालिका व इतर प्रशासकीय विभागाकडून कोरोना विषाणूचा प्रभाव कमी करण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. गर्दीच्या ठिकाणी काही नियम पाळण्याचे तसेच काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अशीच जनजागृती जुहू येथील चौपाटीवर वाळू शिल्प कलाकार लक्ष्मी गौडा यांनी आपल्या वाळू शिल्पातून केली आहे.
जुहू चौपाटीवर वाळू शिल्पातून कोरोना विषाणूची जनजागृती कोरोना विषाणू रुग्णाची वाढती संख्या पाहता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे आणि पिंपरी चिंचवड या शहरातील व्यायामशाळा जलतरण तलाव, नाट्यगृह, सिनेमा गृह व आज राज्यातील शाळा, महाविद्यालय 31 मार्च पर्यंत बंद राहणार असल्याचे परिपत्रक काढले आहे.
हेही वाचा -कोरोना व्हायरस: राज्यातील आकडा 26, तर मुंबईत 9 रुग्ण...
देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील समुद किनारे सर्वांसाठी आकर्षक असल्याने देश, विदेशातील पर्यटक रोज गेट वे मरीन लाइन, गिरगाव चौपाटी तसेच उपनगरातील जुहू चौपाटी प्रसिद्ध आहे. जुहू चौपाटीवर शनिवार आणि रविवारी पर्यटकांची मोठी गर्दी पहायला मिळते. परंतु गर्दीचे प्रमाण लक्षात घेऊन वाळू शिल्पकार लक्ष्मी गौड यानी कोरोना विषाणू पासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. तसेच, खबरदारी म्हणून मास्क वापरले पाहिजे, असे वाळूचे शिल्प उभे केले आहे.
हेही वाचा -कोरोनाची धास्ती : राज्यातील शाळा-महाविद्यालये ३१ मार्च पर्यंत बंद करण्याचे आदेश