मुंबई -कोरोना आणि लॉकडाऊनचा बांधकाम व्यावसायावर झालेला दुष्परिणाम आता आणखी गडद होऊ लागला आहे. प्रकल्पाचे बांधकाम पूर्णतः बंद असल्याने मोठा आर्थिक फटका बसत असताना आता घराच्या नोंदणीत (बुकिंग) 78 टक्क्यांची घट झाली आहे, तर केलेली नोंदणी रद्द करण्याचे प्रमाण थेट 200 टक्क्यांवर गेले आहे. त्यामुळे आता बिल्डर हवालदिल झाले आहेत.
कोरोना इफेक्ट: घरांच्या नोंदणीत 78 टक्क्यांची घट, बांधकाम व्यावसायिक हवालदील
बांधकाम व्यवसाय गेल्या कित्येक वर्षांपासून मंदीची झळ सोसत आहे. त्यात आता लॉकडाऊन आणि कोरोनाच्या संकटाने ही झळ आणखी तीव्र केली आहे. कारण मागील महिन्याभरापासून काम बंद आहे, तर पुढे आणखी काही महिने काम बंदच राहणार आहे.
बांधकाम व्यवसाय गेल्या कित्येक वर्षांपासून मंदीची झळ सोसत आहे. त्यात आता लॉकडाऊन आणि कोरोनाच्या संकटाने ही झळ आणखी तीव्र केली आहे. कारण मागील महिन्याभरापासून काम बंद आहे, तर पुढे आणखी काही महिने काम बंदच राहणार आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या खर्चात वाढ होणार असून काम बंद असल्यानेही आर्थिक नुकसान होणार आहे. अशात आता ग्राहकांनाही आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत असल्याने त्यांनी ही घर खरेदी पुढे ढकलण्यास सुरुवात केली आहे.
मार्चमध्ये घराच्या नोंदणीत तब्बल 78 टक्क्यांची घट झाली आहे, तर घराची नोंदणी रद्द करणाऱ्यांचे प्रमाण 200 टक्क्यांवर गेले आहे. त्याचवेळी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून 31 मार्चपर्यंत 7776 जणांनी घरे पाहण्यासाठी नाव नोंदवली होती. ती सर्वच्या सर्व नोंदणी ही रद्द झाली आहे. ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीज-कॉन्फर्डेशन अॅण्ड रिएल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ (एमसीएचआय-क्रेडाई)‘ च्या कोव्हिड १९ : स्थावर संपदेवर परिणाम’या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.