महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात कोरोनाग्रस्त पोलिसांची संख्या 1809 वर, 18 पोलिसांचा मृत्यू - Maharashtra corona update

राज्यातील विविध ठिकाणी उपचार घेत असलेले 678 पोलीस कोरोनातून बरे झाले असून यात 52 पोलीस अधिकारी व 626 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अजूनही 1113 पोलिसांवर उपचार सुरू असून यात 141 पोलीस अधिकारी व 972 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर मुंबई पोलीस खात्यातील 2000 हुन अधिक पोलीस कर्मचारी हे कोरोनातून बरे होऊन पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले आहेत.

महाराष्ट्र पोलीस
Maharashtra police

By

Published : May 25, 2020, 3:14 PM IST

मुंबई- लॉकडाऊनची अंमलबजावणी रस्त्यावर 24 तास उभे राहून करणारे पोलीस हे कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण आटोक्यात वाढत आहे. राज्यात 1809 पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात तब्बल 194 पोलीस अधिकारी असून 1615 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्यातील 18 पोलीस कर्मचाऱ्यांचा आतापर्यंत दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

राज्यातील विविध ठिकाणी उपचार घेत असलेले 678 पोलीस कोरोनातून बरे झाले असून यात 52 पोलीस अधिकारी व 626 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अजूनही 1113 पोलिसांवर उपचार सुरू असून यात 141 पोलीस अधिकारी व 972 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर मुंबई पोलीस खात्यातील 2000 हुन अधिक पोलीस कर्मचारी हे कोरोनातून बरे होऊन पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले आहेत.

लॉकडाऊन काळात राज्यात कलम 188 नुसार तब्बल 1 लाख 14 हजार 287 गुन्हे नोंदविण्यात आले असून 695 जणांवर क्वारंटाईन मोडल्याच्या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांवर हल्ला होण्याच्या 248 घटना घडल्या असून यात आतापर्यंत पोलिसांनी 830 जणांना अटक केली आहे. कोरोनाच्या संदर्भात पोलिसांच्या 100 क्रमांकाच्या नियंत्रण कक्षावर तब्बल 96238 कॉल आले असून अवैद्य वाहतुकीच्या 1322 प्रकरणात 71045 वाहन जप्त करण्यात आली आहेत. कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्स व मेडिकल स्टाफ वर 40 ठिकाणी हल्ले झाले असून तब्बल 86 पोलीस कर्मचारी हे जखमी झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details