मुंबई Cordelia Cruise Drugs Case : मुंबईतील कार्डेलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणी महसूल अधिकारी समीर वानखेडे यांच्या चौकशीसाठी नार्कोटिक्स कंट्रोल ड्रग्ज ब्युरोचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग हे चौकशीच्या पथकाचा भाग असू शकत नाहीत, असा दावा समीर वानखेडे यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रांमध्ये केलाय. कॅटनं काल पुन्हा समीर वानखेडे यांना दिलासा देणारा निर्णय दिलाय. कॅटनं एनसीबीचं म्हणणं फेटाळून लावलंंय. त्यामुळंच बेकादेशीर चौकशी आणि त्याच्या आधारे खटला चालवणं कायद्याला धरुन नसल्याचं समीर वानखेडे यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय.
ही चौकशी बेकायदेशीर : समीर वानखेडे तत्कालीन एनसीबीचे अधिकारी असताना कार्डेलिया क्रूज ड्रग्स प्रकरणात त्यांनी छापा टाकला होता. त्या प्रकरणात आर्यन खानला सुटका करण्यासाठी शाहरुख खानकडून लाच घेतल्याचा आरोप समीर वानखेडेंवर ठेवण्यात आला होता. समीर वानखेडे यांच्याविरुद्ध सीबीआयनं गुन्हा नोंदवून चौकशी सुरू केली. या चौकशीच्या पथकाचे अध्यक्ष एनसीबीचे तत्कालीन उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग आहेत. परंतु, त्यांच्याबाबतच समीर वानखेडेंनी आक्षेप घेत ते तपासाचा भाग असू शकत नाही. त्यामुळं ही चौकशीच बेकायदेशीर असल्याचं त्यांचं म्हणणं असल्याचं त्यांनी कालच्या प्रतिज्ञापत्रात मांडलंय.
एफआयआर रद्द करण्याची मागणी : केंद्रीय प्रशासकीय न्यायाधीकारणासमोर समीर वानखेडेंच्या प्रकरणाबाबत NCB चा पुनरावलोकन अर्ज दाखल झाला होता. तो अर्ज कॅट अर्थात केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणानं फेटाळून लावलाय. कॅटच्या फेटाळून लावलेल्या आदेशाच्या आधारे समीर वानखेडेंनी सीबीआयकडून त्यांच्या विरोधात जो एफआयआर नोंदवला गेलाय, तो रद्द करण्याची मागणी केलीय. तसंच त्याबाबत कॅटच्या आदेशाची माहिती त्यानं मुंबई उच्च न्यायालयालाही दिलीय.
काही दिवसांत सुनावणी होणे अपेक्षित :नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं समीर वानखेडे यांच्या विरोधात पुनरावलोकन अर्ज सादर केल्यानंतर कॅटनं समीर वानखेडेंच्या बाजूने निकाल दिला. या निकालाची प्रत प्रतिज्ञापत्रासह समीर वानखेडेंनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलीय. त्यात त्यांनी नमूद केलंय की, त्यांच्या विरोधात केंद्रीय गुन्हे अन्वेषण कडून दाखल केलेली एफआयआर ही विशेष तपास पथकाच्या अहवालावर आधारित आहे. हा तपास तत्कालीन अधिकारी ज्ञानेश्वर सिंग यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आल्यानं तो कायदेशीर नसल्याचं त्यानी प्रतिज्ञापत्रात म्हटलंय. पुढील काही दिवसात मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भात सुनावणी होणे अपेक्षित आहे.
हेही वाचा :
- Sameer Wankhede Case : कार्डेलिया ड्रग्ज प्रकरणी समीर वानखेडेंना 7 सप्टेंबरपर्यंत दिलासा
- Sameer Wankhede News: समीर वानखेडे-क्रांती रेडकर दोघांनी पहिल्यांदाच एकत्रित घेतले साईंचे दर्शन, 'हा' मागितला आशिर्वाद
- Sameer Wankhede Death Threat : समीर वानखेडे यांना बांगलादेशमधून जीवे मारण्याची धमकी, गोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल केली तक्रार