नवी मुंबई - 'जाको राखे साईया, मार सके ना कोई' या म्हणीचा प्रत्यय आपल्याला आयुष्यात बऱ्याचदा येतो. कारण शेवटी जिथे सगळे उपाय खुंटतात, तिथे आपण परमेश्वराचा धावा करतो. आणि परमेश्वर ही दयाळू आहे, हे तो वारंवार सिद्ध करतो. नवीन पनवेल सेक्टर 13 येथील टाईप मध्ये राहणारे कॉन्स्टेबल संतोष अंबाजी भगत यांच्याबाबतीत काहीसे असेच घडले आहे.
पोलीस कर्मचाऱ्याची कोरोनावर मात; 14 दिवसांच्या उपचारानंतर कोरोनामुक्त - मुंबई कोरोना अपडेट्स
आपण कोरोनावर मात करू शकलो. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये, मात्र कोरोनापासून वाचण्यासाठी सुरक्षेचे सर्व नियम पाळावेत, असे आवाहन कॉन्स्टेबल संतोष भगत यांनी केले आहे. दरम्यान, आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे, संतोष भगत यांना कोरोना झाल्यानंतर त्यांच्या पत्नी व मुलीलाही कोरोनाची लक्षणे दिसून आली होती.
मानखुर्द पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेले, संतोष अंबाजी भगत यांनी, 23 मार्च रोजी ताप आल्याने व कोरोना संबंधीची लक्षणे दिसू लागल्यामुळे, तातडीने खारघर येथील ग्राम विकास भवनमध्ये आपली वैद्यकीय तपासणी करून घेतली. त्यानंतर त्यांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना पनवेल महापालिकेच्या जिल्हा उप रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी कोरोनाशी निकराने लढाई करत त्यांनी कोरोनावर विजय प्राप्त केला आणि रविवारी ते पूर्णपणे बरे होऊन घरी परतले.
आपण कोरोनावर मात करू शकलो. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये, मात्र कोरोनापासून वाचण्यासाठी सुरक्षेचे सर्व नियम पाळावेत, असे आवाहन कॉन्स्टेबल संतोष भगत यांनी केले आहे. दरम्यान, आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे, संतोष भगत यांना कोरोना झाल्यानंतर त्यांच्या पत्नी व मुलीलाही कोरोनाची लक्षणे दिसून आली होती. त्यांनाही ही उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारानंतर त्यांच्या सर्व चाचण्या निगेटिव्ह आल्या असून, त्यांनाही येत्या एक-दोन दिवसात डिस्चार्ज देण्यात येणार आहे. कॉन्स्टेबल संतोष भगत यांच्या खंबीर मानसिकतेमुळे ते कोरोनावर विजय प्राप्त करू शकले.