महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

BJP MLA Nitesh Rane : बाबासाहेबांचा कुठे जन्म झाला? संजय राऊत यांच्या वक्तव्यावर नितेश राणे यांचे वादग्रस्त ट्विट - Nitesh Rane

शिवसेना खासदार, नेते संजय राऊत यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महाराष्ट्रात झाला, असे विधान राऊत केल्याने चांगलेच अडचणीत सापडले (Sanjay Raut statement on Birth of Dr Ambedkar) आहेत. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत त्यांच्यावर निशाणा साधला (tweet of BJP MLA Nitesh Rane on Sanjay Raut) आहे. महामोर्चाच्या २ दिवसापूर्वीच संजय राऊत यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल चुकीची माहिती दिल्या कारणाने अडचणीत सापडले आहेत.

नितेश राणे यांचे वादग्रस्त ट्विट!
नितेश राणे यांचे वादग्रस्त ट्विट!

By

Published : Dec 16, 2022, 8:47 AM IST

शिवसेना खासदार, नेते संजय राऊत

मुंबई :महापुरूषांच्या सतत होणाऱ्या अपमानाने अपमानामुळे राज्यात वातावरण तापलेले असताना त्यात आणखी भर म्हणून शिवसेना खासदार, नेते संजय राऊतयांनी केलेल्या विधानावरून आता पुन्हा नवीन वाद निर्माण झाला आहे. मुंबईत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देत असताना भारत रत्न डॉक्टर बाासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला, असे विधान राऊत यांनी केल्याने ते चांगलेच अडचणीत सापडले (Sanjay Raut statement on Birth of Dr Ambedkar) आहेत. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ट्विट करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

नितेश राणे यांचे वादग्रस्त ट्विट!



काय म्हणाले राणे :संजय राऊत यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांबद्दल बोलताना त्यांचा जन्म महाराष्ट्रात झाला असे सांगितले. त्यावर त्यांचा हा व्हिडिओ ट्विट करत नितेश राणे म्हणाले की, या मुर्खाला इतकेही माहित नाही की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला. ते म्हणतात त्यांचा जन्म महाराष्ट्रात झाला. हा महापुरुषांचा अपमान नाही का? माफी मागा. अशा पद्धतीचे ट्विट नितेश राणे यांनी केले (Controversial tweet of BJP MLA Nitesh Rane) आहे.



सत्ताधार्‍यांच्या हातात कोलीत : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच अन्य महापुरुषांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून विरोधक आक्रमक झाले असून शनिवारी १७ डिसेंबर रोजी त्यांनी या संदर्भात महामोर्चाचे आयोजन केले आहे. त्या महामोर्चाच्या २ दिवसापूर्वीच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल चुकीची माहिती दिल्या कारणाने ते आता अडचणीत सापडले आहेत. सत्ताधार्‍यांच्या हातात संजय राऊत यांच्या वक्तव्याने आयते कोलीत सापडले आहे.



आंबेडकर यांचा जन्म : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशातील, महू या गावात १४ एप्रिल १८९१ रोजी झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी मालोजी सकपाळ असे असून त्यांच्या आईचे नाव भिमाबाई मुबारदकर असे (Birth of Doctor Babasaheb Ambedkar) होते.

ABOUT THE AUTHOR

...view details