मुंबई -रखडलेला शिंदे- फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार ( Sanjay Rathod inducted in Shinde Cabinet ) अखेर काल पार पडला. या विस्तारात शिंदे गट ( cm eknath shinde cabinet ) आणि भाजप यांच्या प्रत्येकी ९ अशा एकूण १८ मंत्र्यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ( abdul sattar inducted in cm eknath shinde cabinet ) यांनी गोपनीयतेची शपथ दिली. परंतु, या १८ मंत्र्यांमध्ये शिंदे गटाकडून शपथ घेतलेल्या ९ मंत्र्यांपैकी संजय राठोड व अब्दुल सत्तार यांना संधी देण्यात आल्याने वादाची ठिणगी पडली आहे. संजय राठोड आणि अब्दुल सत्तार या दोघांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर ( cm eknath shinde cabinet expansion ) विधिमंडळात आणि विधिमंडळाबाहेर सरकारवर जोरदार टीका होणार असून हे शिंदे यांना माहीत असून सुद्धा असे का केले, अशी चर्चा आता होऊ लागली आहे.
हेही वाचा -Covid-19 In India : कोरोनाचा आलेख घसरला, देशात 16 हजार 047 नवीन कोरोनाबाधित, 54 रुग्णांचा मृत्यू
राठोड, सत्तार यांना क्लीन चिट? - काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर सर्वात अगोदर भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याने त्यांच्यावर जोरदार टीका केली. पूजा चव्हाण या युवतीच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या संजय राठोड यांचा मंत्रिमंडळातील समावेश ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे सांगत, राठोड मंत्री झाले तरी माझा लढा मी सुरूच ठेवणार, असे चित्रा वाघ म्हणाल्या. यावर महाविकास आघाडी सरकारच्या काळात पोलिसांनी संजय राठोड यांना क्लीन चिट दिली होती. म्हणून त्यांचा समावेश करण्यात आला आहे. या उपर जर कोणाचे काही मत असेल तर ते ऐकून घेण्यात येईल. त्याचबरोबर अब्दुल सत्तार यांना टीईटी घोटाळ्यात शिक्षण विभागाने क्लीन चीट दिल्याने त्यांचा समावेश मंत्रिमंडळात करण्यात आला असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
राठोड यांच्यावर काय आहे आरोप? -पूजा चव्हाण या युवतीच्या आत्महत्येप्रकरणी राठोड यांच्यावर आरोप झाले होते. युवतीने आत्महत्येपूर्वी राठोड यांच्या निकटवर्तीयांबरोबर केलेल्या संभाषणात सातत्याने संजय राठोड यांचा उल्लेख केला होता. या युवतीची ध्वनिफीती समाज माध्यमांमध्ये प्रसारित होताच त्यावरून गदारोळ झाला होता. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. सरकारच्या प्रतिमेवर होणारा परिणाम आणि भाजपकडून सातत्याने केला जाणाऱ्या आरोपांमुळे राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला. पुढे तरुणीच्या कुटुंबीयांनी राठोड यांच्या बाबत पोलिसांना दिलेल्या जबाबदातून राठोड आत्महत्येस जबाबदार नसल्याचे कारण देत पोलिसांनी राठोड यांना निर्दोषेत्व बहाल केले. मात्र सरकारच्या दबावामुळे पोलिसांनी राठोड यांच्याविरुद्ध कारवाई केली नसल्याचे आणि कुटुंबीयांनी अयोग्य जबाब दिला असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला होता आणि उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
तेव्हापासून एकनाथ शिंदे राठोड यांच्या पाठीशी -महाविकास आघाडी सरकारमध्ये संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण या तरुणीची आत्महत्या प्रकरणावरून आरोप होताच तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अस्वस्थ झाले होते. राठोड यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांच्या दबावाबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आग्रह धरल्याने त्यांची चांगली अडचण झाली होती. अशावेळी एकनाथ शिंदे हे मात्र संजय राठोड यांच्या पाठीशी ठामपणे उभे होते व त्यांचा राजीनामा घेऊ नये असे ते सांगत होते. तरीसुद्धा वाढत्या दबावाच्या कारणाने उद्धव ठाकरे यांना संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा लागला होता. परंतु, आता आपल्या मंत्रिमंडळात राठोड यांना संधी देत आमदार व मंत्र्यांना कसे सांभाळायचे हे त्यांनी उद्धव ठाकरे यांना दाखवून दिल्याबरोबरच दिलेला शब्द खरा करून दाखवण्याचे व आमदारांची मन जिंकण्याचाही त्यांनी प्रयत्न केला आहे.