महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत नियंत्रण कक्षाची स्थापन - मुंबईत नियंत्रण कक्षाची स्थापन

महानगरपालिका नियंत्रण कक्षाचा संपर्क क्रमांक ०२२-४७०८५०८५ तर, टोल फ्री क्रमांक १९१६ असा आहे. महानगरपालिकेने अन्न व निवारा संदर्भात १८००२२१२९२ ही हेल्पलाईन सुरू केली आहे, जी सकाळी ९ते रात्री ९ पर्यंत सुरू असणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत नियंत्रण कक्षाची स्थापन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत नियंत्रण कक्षाची स्थापन

By

Published : Mar 31, 2020, 2:39 PM IST

मुंबई- कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्याच्या नियंत्रणासाठी मुंबई जिल्ह्यात विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्याचा संपर्क क्रमांक ०२२-२२६६४२३२ असल्याची माहिती मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी दिली आहे.

महानगरपालिका नियंत्रण कक्षाचा संपर्क क्रमांक ०२२-४७०८५०८५ तर, टोल फ्री क्रमांक १९१६ असा आहे. महानगरपालिकेने अन्न व निवारा संदर्भात १८००२२१२९२ ही हेल्पलाईन सुरू केली आहे, जी सकाळी ९ते रात्री ९ पर्यंत सुरू असणार आहे. मुंबई जिल्ह्यातील नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याबाबत प्रशासन संपूर्ण प्रयत्न करीत असून महत्त्वाच्या ठिकाणी असलेले भाजीपाला, किराणा मालाचे मार्केट सुरू करण्यात आले आहेत. तिथे गर्दी होऊ नये, यासाठीदेखील काळजी घेण्यात येत आहे.

असंघटित मजूर वर्गासाठी धारावी, सायन- कोळीवाडा, वडाळा, वरळी, माहीम, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा विभागातील स्थानिक कार्यालयामार्फत भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे. कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासनास संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details