मुंबई -राज्याचा 2021 - 22 चा अर्थसंकल्प आज अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात सादर केला. या अर्थसंकल्पावर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपण खूष असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर, घर घेताना पतीसोबत पत्नीचे नाव लावल्यास स्टॅम्प ड्युटीमध्ये 1 टक्का सूट देण्याच्या घोषणेबाबत महिलांनी संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे.
अर्थसंकल्पावर नागरिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत कंत्राटी कर्मचाऱ्यांना काहीच दिले नाही -
अर्थमंत्री अजित पवार यांनी आज 2021-22चा जो अर्थसंकल्प सादर केला आहे, तो तुटपुंजा आहे. राज्यातील संगणक परिचारक हे कंत्राटी कर्मचारी आहेत. त्यांना किमान वेतन देण्याबाबत कोणतीही तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही. यामुळे आम्ही या अर्थसंकल्पावर खुश नाही, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य संगणक परिचारक संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी दिली. राज्य सरकारने पुरवणी मागण्या किंवा तरतूद करून कंत्राटी संगणक परीचारकांसाठी वेगळी तरतूद करावी, अशी मागणी मुंडे यांनी केली आहे.
महिलांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया -
घर घेताना पतीसोबत पत्नीचे नाव नोंद केल्यास स्टँप ड्युटीमध्ये 1 टक्का सूट देण्याची घोषणा केली आहे. यावर बोलताना घोषणा होतात मात्र, हे सत्यात उतरले पाहिजे. वडिलांच्या नंतर आईच्या नावावर घर झाले नसल्याने आम्ही घराबाहेर आहोत, अशी प्रतिक्रिया स्नेहल पटेल या महिलेने दिली आहे. तर, या निर्णयामुळे महिलांना काही प्रमाणात दिलासा मिळेल. महिलांवर अत्याचार झाल्यास त्यांच्यावर अत्याचार होण्याच्या प्रमाणात काही प्रमाणात घट होईल. मात्र, त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, असे मत अंजली जाधव यांनी व्यक्त केले.