मुंबई- मुंबईत कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. रोज कोरोनाची लागण झालेले शेकडो रुग्ण आढळून येत असल्याने कंटेनमेंट झोनच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईत सध्या 2 हजार 646 कंटेनमेंट झोन असून गेल्या 12 ते 13 दिवसात या झोनच्या संख्येत तिप्पटीहून अधिक वाढ झाल्याचे पालिकेने दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचे मुंबईत रोज शेकडो रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यावर त्या विभागाला, इमारतीला सील करुन तो विभाग कंटेनमेंट झोन म्हणजेच प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला जातो. अशा विभागातील रहिवाशांना त्या विभागातून बाहेर जाण्यास तसेच बाहेरच्यांना त्या विभागात येण्यास परवानगी नसते.
मुंबईत 11 मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. एप्रिल महिन्यात कंटेनमेंट झोनची संख्या 1 हजार 36 वर गेली होती. मात्र 231 कंटेंटमेंट झोनमध्ये 14 दिवसात एकही रुग्ण आढळून आला नसल्याने हे विभाग कंटेंटमेंट झोनमधून वगळण्यात आले. यामुळे 27 एप्रिलला मुंबईमधील कंटेंटमेंट झोनची संख्या 805 वर आली होती. त्यानंतर आतापर्यंत मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 13 हजार 564 तर मृतांचा आकडा 508 वर पोहोचला आहे. त्यामुळे कंटेनमेंट झोनची संख्या 2 हजार 646 वर पोहचली आहे. 27 एप्रिलनंतर कंटेनमेंट झोनच्या संख्येत तिपटीहून अधिक वाढ दिसून आली आहे.
कंटेनमेंट झोन
मुंबईत सर्वात जास्त 'कंटेनमेंट झोन' हे 'जी/ उत्तर' विभागातील दादर, धारावी, माहीम, माटुंगा आदी 370 ठिकाणी आहेत. त्यापाठोपाठ ' एल' विभागातील कुर्ला, चुनाभट्टी आदी 278 ठिकाणी कंटेनमेंट झोन आहेत. 'के/ पश्चिम' विभातील सांताक्रूझ, जुहू, अंधेरी, जोगेश्वरी, विलेपार्ले आदी 255 ठिकाणी 'कंटेनमेंट झोन' आहेत. 'ई' विभागातील भायखळा, माझगाव, मुंबई सेंट्रल, नागपाडा, कामाठीपुरा, घोडपदेव, आग्रीपाडा, दगडीचाळ मदनपुरा, मोमीनपुरा, काळाचौकी आदी 221 ठिकाणी कंटेनमेंट झोन आहेत. तर सर्वात कमी कंटेनमेंट झोन' हे 'ए' विभागात फोर्ट, कुलाबा आदी ठिकाणी 16 कंटेनमेंट झोन आहेत. त्यापाठोपाठ आर/उत्तर विभागात 26 तर 'टी' मुलुंड विभागात 29 कंटेनमेंट झोन आहेत.
मुंबईतील 'कंटेनमेंट झोन' ची वॉर्डनिहाय संख्या
(1) 'जी/ उत्तर' - 370 ठिकाण 'कंटेनमेंट झोन' यामध्ये, दादर, धारावी, माहीम, माटुंगा
(2) 'एल' - 278 ठिकाण कुर्ला, चुनाभट्टी आदी
(3) 'के/पश्चिम' - 225 ठिकाण यामध्ये, सांताक्रूझ, जुहू, अंधेरी, जोगेश्वरी, विलेपार्ले, वर्सोव
(4) 'ई' - 221 ठिकाण यामध्ये, भायखळा, माझगाव, कामाठिपुरा, आग्रीपाडा, मुंबई सेंट्रल, घोडपदेव, दगडी चाळ, काळा चौकी, मदनपुरा
(5) 'एच/ पूर्व' - 165 ठिकाण यामध्ये, वांद्रे, बेहराम पाडा, खार,
बिकेसी, सांताक्रूझ, कालिना
(6) 'एम / पूर्व' - 152 ठिकाण यामध्ये देवनार, मानखुर्द, गोवंडी, शिवाजी नगर, चेंबूर, वाशीनाक
(7) 'जी/ दक्षिण' - 143 ठिकाण यामध्ये महालक्ष्मी, सातरस्ता, जेकबसर्कल, लोअर परळ, एल्फिन्स्टन रोड, प्रभादेवी, वरळी इत्यादी
(8)'के/ पूर्व' - 120 ठिकाण यामध्ये, अंधेरी, मरोळ, जेबी नगर, जोगेश्वरी,सहार रोड, विलेपार्ले इत्यादी
(9) 'एफ/दक्षिण' - 108 ठिकाण यामध्ये, भोईवाडा, परळ, चिंचपोकळी, लालबाग, शिवडी, केईएम रुग्णालय परिसर, दादर, नायगाव इत्यादी
(10) 'एन' - 109 ठिकाण यामध्ये, घाटकोपर, पंतनगर, विक्रोळी पार्कसाईट, अमृतनगर, जगदुशा नगर, भटवाडी, गोळीबार रोड इत्यादी
(11) 'पी/ उत्तर' - 102 ठिकाण यामध्ये, गोरेगाव, दिंडोशी, मालाड, मालवणी, कुरार व्हिलेज, कांदिवली इत्यादी
(12) 'एम/पश्चिम' - 97 ठिकाण यामध्ये, चेंबूर, घाटला व्हिलेज, शेल कॉलनी, चेंबूर नाका, टिळक नगर, लोखंडे मार्ग इत्यादी
(13) ' एस' - 89 ठिकाण यामध्ये, भांडुप, सोनापूर, खिंडीपाडा, कांजूरमार्ग, विक्रोळी, टेंभीपाडा इत्यादी
(14) 'डी' - 82 ठिकाण यामध्ये, यामध्ये, खेतवाडी, चरनी रोड, गिरगाव, ग्रँट रोड, खोताची वाडी, वाळकेश्वर, नेपीयंसी रोड, ताडदेव, कामाठीपुरा, गावदेवी, मुंबई सेंट्रल इत्यादी
(15) 'आर/दक्षिण'- 81 ठिकाण यामध्ये, कांदिवली, संजय नगर,आकुर्ली रोड, लालजीपाडा, इस्लाम कंपाऊंड, जनता कॉलनी, चारकोप इत्यादी
(16) 'एफ/ उत्तर' - 75 ठिकाण यामध्ये, दादर, माटुंगा, पारशी कॉलनी, सायन, कोळीवाडा, षण्मुखानंद हॉल, किंगज सर्कल, प्रतीक्षानगर, शिवडी, जिटीबी नगर, वडाळा, अंटोप हिल,
(17) 'पी/ दक्षिण' - 66 ठिकाण यामध्ये, गोरेगाव, मालाड इत्यादी
(18) 'एच/पश्चिम' - 59 ठिकाण यामध्ये, वांद्रे, वांद्रे रिकलेमेशन, भाभा रुग्णालय परिसर, खार, सांताक्रूझ इत्यादी
(19) आर/मध्य - 53 ठिकाण यामध्ये, बोरिवली, देवीपाडा, कांदिवली इत्यादी
(20) 'बी' - 52 ठिकाण यामध्ये, डोंगरी, मांडवी, मस्जिद बंदर, भेंडी बाजार,उमरखाडी, कर्णक रोड, चिंचबंदर इत्यादी
(21) 'सी' - 51 ठिकाण चरनी रोड, मरिन लाईन्स, काळबादेवी, बदामवाडी, नळबाजार, भुलेश्वर, कुंभारवाडा इत्यादी
(22) 'टी' - 29 ठिकाण यामध्ये, यामध्ये, मुलुंड, गव्हाण पाडा,विजय नगर, बिनानगर, मॅरेथॉन कॉसमॉस इत्यादी
(23) आर/उत्तर - 26 ठिकाण यामध्ये, दहिसर, केतकीपाडा, रावळीपाडा इत्यादी
(24) 'ए' - 16 ठिकाण यामध्ये कुलाबा, डोंगरी, फोर्ट, मरिन लाईन्स
हेही वाचा -मुंबईहून गावी परतणाऱ्या मजुरांना पालिकेकडून अन्न, पाणी, मास्कचे वाटप