महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Navi Mumbai Accident: कंटेनरचा झाला ब्रेक फेल; पाच गाड्यांना दिली जोरदार धडक - Navi Mumbai Accident

नवी मुंबईत आज दुपारच्या सुमारास कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने, विचित्र अपघात घडला आहे. हा अपघात ऐरोली रबाळे येथे घडला असून कंटेनरने धडक दिलेल्या गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Accident News
कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने अपघात

By

Published : Jul 7, 2023, 8:07 PM IST

कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने अपघात

नवी मुंबई: ऐरोली रबाळे येथील अंडरबायपास रोडवर हा अपघात झाला. MH 46BB 3931 क्रमांकाचा कंटेनर ऐरोली रबाळे येथील अंडर बायपास रोड वरून मुंबईच्या दिशेने जात होते. मात्र त्याचवेळी कंटेनरचा ब्रेक फेल झाला. चालकाने प्रयत्न करूनही काहीही उपयोग झाला नाही, शेवटी ज्या रांगेत कंटेनर होता त्या रांगेत असणाऱ्या पाच गाड्यांना कंटेनरने जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात झाला आहे.



गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान : पाच गाड्यांना कंटेनरने जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. यामध्ये इर्तिका, ऑटोरिक्षा, टेम्पो, होंडासिटी व महिंद्रा एक्सयुव्ही अशा ५ गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांना जोरात धडक दिल्याने, गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रिक्षा तर पूर्णपणे चेपली गेली असून, यातील एका प्रवाशाच्या हाताला दुखापत झाली आहे. या अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. घटनास्थळी पोलीस व वाहतूक पोलीस उपस्थित झाले.

आणखी एक अपघात : या आधीही अशीच एक घटना घडली होती. पुणे शहरातील नवले पूल परिसरात ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने एकूण चार वाहनांना धडक दिली होती. नऱ्हे येथील भूमकर पूल चौकात दररोज सकाळी आणि सायंकाळी मोठी गर्दी होत असते. ऐन गर्दीच्या वेळी कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने एकच हाहाकार उडाला होता. या अपघातातील एका क्रेटा वाहनाला कंटेनरने पाठीमागून जोराची धडक दिल्याने क्रेटा हवेत चेंडूसारखी उडाली होती. काही क्षणाकरिता तिथे असलेल्या नागरिकांना काय झाले हेच समजले नाही. तिथे असलेले वाहतूक कर्मचारी माधव गोपनर यांच्या जवळून कंटेनर गेला होता. ते थोडे जरी मागे-पुढे थांबले असते तर मोठा अनर्थ झाला असता. कंटेनरचालक पंकज महापात्रे (वय ५७ वर्षे, रा. उमरगा, जिल्हा उस्मानाबाद) याला सिंहगड रस्ता पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

हेही वाचा -

  1. Chandrapur Accident : चंद्रपुरात कारची बसला जोरदार धडक; सहा ठार
  2. Chhattisgarh Accident : ट्रक आणि पिकअपच्या भीषण अपघातात 6 महिला ठार, 10 नागरिक जखमी
  3. Buldhana Bus Accident: समृद्धी महामार्गावरील अपघाताचे धक्कादायक कारण, फॉरेन्सिक अहवालातून समोर आली माहिती

ABOUT THE AUTHOR

...view details