मुंबई - हिवाळा सुरू झाला आहे. या ऋतुत उबदार कपड्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. स्वेटर विक्रेते आपापली दुकाने थाटत असतात. मुंबईतील परळ भागात इतर राज्यातून देखील दुकानदार येतात. या सर्व दुकानदारांना यावेळी निराश व्हावे लागले आहे. कारण स्वेटरची विक्रीच होत नाही. ईटीव्ही भारतने याचाच विशेष रिपोर्ट केला आहे.
ग्राहकांनी स्वेटर बाजाराकडे पाठ फिरवली आहे. कारण डिसेंबर महिना उजाडला तरी देखील थंडीची चाहुलही नाही. त्यामुळे ग्राहक अद्याप हवे तेवढ्या प्रमाणात बाजारात खरेदीसाठी येत नाही आहेत. तसेच यंदा स्वेटरच्या किमती देखील थोड्या चढ्या भावाने असल्याने ग्राहक खरेदी न करणेच पसंद करत आहेत. त्यामुळे यंदा हा बाजार जरी फुलला असला तरी व्यापाऱ्यांच्या निराशेने कोमेजलेला आहे .