महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Uber Fine : महिलेची फ्लाईट चुकल्याने उबेरला वीस हजाराचा दंड

मुंबईतील उबेर कंपनीच्या टॅक्सी चालकाने (Uber company taxy service) प्रवासी महिलेला वेळेत विमानतळावर पोचवले नाही. त्यामुळेम हिलेचे चेन्नईला जाणारे विमान (missing woman flight in Mumbai) चुकले. या बद्दल प्रवासी महिलेने दाखल केलेल्या याचिकेमध्ये ग्राहक न्यायालयाने (Uber Penalty of Consumer Court) महिलेच्या बाजूने निकाल देत उबेरला यासाठी 20 हजाराचा दंड ठोठावला (Consumer court fined to Uber company) आहे.

Uber Fine
Uber Fine

By

Published : Oct 26, 2022, 1:17 PM IST

मुंबई :मुंबईतील उबेर कंपनीच्या टॅक्सी चालकाने (Uber company taxy service) वेळेमध्ये प्रवासी महिलेला विमानतळावर नेले नाही. त्यामुळे त्या महिलेचे चेन्नईला जाणारे विमान (missing woman flight in Mumbai) चुकले. त्यामुळे महिलेने दाखल केलेल्या याचिकेमध्ये ग्राहक न्यायालयाने (Uber Penalty of Consumer Court) महिलेच्या बाजूने निकाल देत उबेरला यासाठी 20 हजाराचा दंड ठोठावला. उबेरने उत्तम सेवा प्रवाशांना दिली नाही असे फटकारले आणि हा सज्जड दंड आकारला, असे एअरपोर्ट रिपोर्टमध्ये संजीव देवासिया या यांनी नमूद केले आहे. (Consumer court fined to Uber company)

उबेर कंपनीला ठोठावलेल्या दंडाविषयी सांगताना वकील

उबेरला सज्जड दंड -मुंबईची गर्दी आणि प्रचंड गर्दीत रस्त्यावरील कोंडीत वाहन पुढे नेणे ही कसरत आहे ही गोष्ट खरीच आहे. परंतु वेळेच्या खूप आधी टॅक्सी बुक करूनही टॅक्सी चालकाने वेळेत विमानतळावर टॅक्सी नेले नाही. यामुळेच एका महिला प्रवासाने मुंबईच्या ग्राहक न्यायालयामध्ये केस दाखल केली होती आणि या याचिकेचा निकाल त्या महिलेच्या बाजूने लागला आणि ग्राहक न्यायालयाने उबेरची सेवा उत्तम नाही. प्रवाशांना समजून घेणारी आणि उत्तम दर्जाची सेवा नाही या कारणास्तव महिलेला झालेला मनस्ताप याची दखल घेत उबेरला सज्जड दंड ठरवला.



ही आहे घटना -घटना 12 जून 2018 रोजी आहे त्या दिवशी प्रवासी महिलेला विमानतळावर जायचे असल्याने उबेरची टॅक्सी बुक केली. ज्या ठिकाणाहून टॅक्सी बुक केली तिथून तर मुंबईची विमानतळ 36 किलोमीटर इतके अंतर होते आणि त्यासाठी दोन तास अवधी पुरेसा होता. प्रवासी महिलेने तीन वाजून 29 मिनिटांनी म्हणजेच विमान उडण्याच्या साधारणता दोन तासापेक्षा अधिक काळ आधी टॅक्सी बुक केली. मात्र उबेरच्या टॅक्सी चालकाने सीएनजी गॅसच्या ठिकाणी 15 ते 20 मिनिटं विनाकारण वेळ घेतला. त्यामुळे टॅक्सी विमानतळावर पोहोचली नाही आणि यामुळे त्या त्या महिलेचे विमान चुकले आणि काढलेले तिकीटही वाया गेले. तसेच, टॅक्सी भाडे बिलाची रक्कम 703 रुपये होती, तर बुकिंगच्या वेळी अंदाजे भाडे 563 रुपये होते. तक्रारदाराने आरोप केला आहे की ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे आणि अव्यावसायिक वर्तनामुळे तिची फ्लाइट चुकली. ट्विटरवर तक्रार केल्यानंतर, उबरने अंदाजे आणि वास्तविक भाड्यातील फरक, 139 रुपये परत केले.उबेरला कायदेशीर नोटीस देऊनही त्यांनी "नाही" असे उत्तर दिल्यानंतर तक्रारदार महिलेने ठाणे अतिरिक्त जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाकडे तक्रार केली.

उबेरच्या टॅक्सीच्या ड्रायव्हरमुळे 'ही' चूक -उबेरच्या वतीने असा दावा केला गेला होता की ,'जर उबेरच्या टॅक्सीच्या ड्रायव्हरमुळे ही चूक झाली. असेल तर ड्रायव्हरच्या चुकीसाठी उबेरला जबाबदार धरता येणार नाही. 'मात्र ग्राहक न्यायालयाने त्यांचे म्हणणे नियमाचे उल्लंघन असल्याने त्याना प्रवाशांना उत्तम सेवा देण्यात अपयशी ठरल्यामुळे दंड ठोठावला. तसेच प्रवासी महिलेने ड्रायव्हरला भाडे भाडे दिले 'असल्याचे ग्राहक न्यायालयाने अधोरेखित केले.

आता 20 हजारांचा दंड भरा-यासंदर्भात मुंबईतील अडवोकेट नितीन सातपुते यांच्याशी ईटीव्ही भारत ने संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, उबेर सारखी तंत्रज्ञानावर आधारित प्रवाशांना सेवा देण्याच्या नावाने प्रवाशांची कशी फसवणूक करते. याचे उत्तम उदाहरण आहे. मात्र कायद्यापुढे कोणीही किती मोठा असला तरी त्याला झुकावे लागते आणि प्रवासी महिलेला झालेला मनस्ताप आणि तिचे झालेले आर्थिक नुकसान याची बरोबर ग्राहक न्यायालयाने दखल घेतली आणि उबेरला फटकारले. 20000 रुपयांचा दंड देखील ठोठावला. त्यामुळे ग्राहक न्यायालयाच्या या दणक्यामुळे उबेर असो की अजून कोणी त्यांना कायद्याचा बडगा दाखवल्याशिवाय ते ऐकत नाही हे सिद्ध झाले "असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details