महाराष्ट्र

maharashtra

Mumbai Coastal Road : कोस्टल रोडच्या दुसऱ्या बोगद्याचे काम महिनाअखेरीस पूर्ण होणार

By

Published : Dec 18, 2022, 6:35 PM IST

मुंबईतील वाढणारी लोकसंख्या, अरुंद रस्ते, रस्त्यांवर दुतर्फा वाहनांची पार्किंग तसेच रोज शेकडो नवीन वाहनांची पडणारी भर यामुळे मुंबईत वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. मुंबईची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई महापालिकेने कोस्टल रोड प्रकल्पाचे (Mumbai coastal road project) काम हाती घेतले आहे. (construction of Mumbai coastal road).

Etv Bharat
Etv Bharat

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड उभारला जात आहे. (Mumbai coastal road project). आतापर्यंत एकूण प्रकल्पाचे 66 टक्क्याहून अधिक काम झाले आहे. कोस्टल रोड प्रकल्पात 2.070 किलोमीटरचे दोन मोठे बोगदे तयार करण्यात येत आहेत. यात एका बोगद्याचे काम 10 जानेवारी रोजी पूर्ण झाले आहे. तर दुसऱ्या बोगदा २०७० मीटरचा असून त्याचे १८०० मीटरचे काम झाले आहे. (second tunnel of Mumbai coastal road project). चार मजली उंची असणाऱ्या मावळा टनेल बोरिंग मशीनने दुसऱ्या बोगद्याचे काम सुरु असून या महिन्याच्या अखेरीस हे काम पूर्ण होईल, असा विश्वास कोस्टल रोडचे प्रमुख मतैय्या स्वामी यांनी व्यक्त केला आहे.

पर्यावरणस्नेही प्रकल्प: मुंबईतील वाढणारी लोकसंख्या, अरुंद रस्ते, रस्त्यांवर दुतर्फा वाहनांची पार्किंग तसेच रोज शेकडो नवीन वाहनांची पडणारी भर यामुळे मुंबईत वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. मुंबईची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई महापालिकेने कोस्टल रोड प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पामुळे मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये कोस्टल रोडच्या कामाचा शुभारंभ झाला. त्यानंतर कोस्टल रोडचे काम वेगाने सुरु आहे. कोरोना काळात काही प्रमाणात काम धीम्या गतीने सुरु होते. कोरोना आटोक्यात आल्याने प्रकल्पाच्या कामाला वेग आला आहे. येत्या नोव्हेंबर २०२३ पर्यंत कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत आणण्याचे नियोजन प्रशासनाचे असल्याचे त्यांनी सांगितले. प्रियदर्शनी पार्क ते वरळी सी-लिंक दरम्यान १०.५८ किमीचा कोस्टल रोड पालिकेकडून बांधण्यात येतो आहे. या प्रकल्पामुळे ३४ टक्के इंधनाची तर ७० टक्के वेळेची बचत होणार आहे. शिवाय कोस्टल रोडमध्ये ७० हेक्टर एवढे हरीत क्षेत्र उपलब्ध होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प पर्यावरणस्नेही ठरणार आहे.

चार मजली इमारती एवढा मावळा! : कोस्टलरोडचा बोगदा खोदणारा मावळा टनेल बोअरिंग मशीनचे वजन तब्बल २३०० टन आहे. तर व्यास १२.१९ मीटर आहे. मावळा मशीनची उंची चार मजली इमारती एवढी आहे. देशातील हा पहिलाच प्रयोग आहे.

दोन पिलरमधील अंतर वाढवले :विकासकामे करताना भूमिपूत्रांवर अन्याय होणार नाही ही आमची भूमिका आहे. मुंबईतील कोस्टल रोडचे काम करताना वरळी कोळीवाड्याजवळील पुलाच्या दोन पिलरमधील अंतर 60 वरून 120 मीटर करण्याच्या निर्णयाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. या भागातील कोळीबांधवांच्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आला असून अत्याधुनिक तंत्रज्ञान, मनुष्यबळाची संख्या वाढवून कोस्टल रोड प्रकल्प वेळेत पूर्ण करावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details