संघाला बदनाम करण्याचा काँग्रेस, राष्ट्रवादीचा कट मुंबई :मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आणि हिंदू समाजाला जाणीवपूर्वक तत्कालीन काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारने बदनाम केले. संघाच्या विरोधात कारस्थान रचले गेले, असा आरोप भाजपचे आमदार राम कदम यांनी केला आहे. ते म्हणाले की, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात विनाकारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्रास देण्याचे काम सुरू आहे. तसेच हिंदू समाजाला बदनाम करण्याचा कट काँग्रेस-राष्ट्रवाद्यीने रचल्याचा आरोप भाजप आमदार राम कदम यांनी केला आहे.
31साक्षीदार का फिरले? :मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आतापर्यंत ज्या साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात येत आहे ते साक्षीदार दिलेल्या साक्षी वरून फिरत आहेत, यावरून हे स्पष्ट होत आहे की, तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादी सरकारंने हिंदू समाजाला आणि संघाला बदनाम करण्यासाठी 31 साक्षीदारांवर दबाव आणण्यात आला तत्कालीन सरकारने पोलिसांच्या माध्यमातून साक्षीदारांना धमकावून जबरदस्तीने त्यांच्याकडून साक्षी नोंदवल्या होत्या हे आता स्पष्ट होत आहे. त्यांच्याकडून जबरदस्तीने हिंदू नेत्यांची नावे आणि संघाचे नाव गोवण्याचा प्रयत्न करण्यात आला असा आरोपही आमदार राम कदम यांनी केला आहे.
संघाला बदनाम करण्याचे शडयंत्र : निवडणुका जवळ आल्या की केवळ हिंदू समाजाची आठवण काँग्रेस राष्ट्रवादीला येते मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीची वर्तणूक हिंदू समाजाच्या विरोधात का आहे? असा सवाल राम कदम यांनी काँग्रेस राष्ट्रवादीला विचारला आहे. प्रखर हिंदुत्वाला आपला का विरोध करता हे काँग्रेस, राष्ट्रवादीने काँग्रेसने स्पष्ट करण्याची मागणी राम कदम यांनी केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू समाजाला बदनाम करण्याचे शडयंत्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केले आहे. निवडणुका आल्या की यांना मालेगाव बाॅम्बस्फोट आठवतो का असा सवाल राम कदम यांनी उपस्थित केला आहे.
काय आहे प्रकरण :29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमध्ये नमाजानंतर मशिदीत बॉम्बचा स्फोट करण्यात आला होता. या घटनेत एकूण ६ जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक नागरिक जखमी झाले. एटीएसने या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली होती. तीन वर्षांनंतर 2011 मध्ये हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आले होते. भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा या प्रकरणात सहभाग आसल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तर या प्रकरणातील अन्य आरोपींमध्ये लेफ्टनंट कर्नल पुरोहित, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी, अजय राहिरकर, समीर कुलकर्णी यांचा समावेश आहे.
हेही वाचा - Sambhajinagar Riot Case : संभाजीनगरमधील दंगलीवरून फडणवीस-पटोलेंमध्ये कलगी तुरा