मुंबई -इंधन दरवाढीवरून काँग्रेस पक्ष सध्या राज्यातील विविध ठिकाणी आंदोलन करत आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वात शनिवारी येथेही आंदोलन पार पडले. यावेळी पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ बैलगाडीतून मोर्चा काढण्यात आला होता. मात्र, आंदोलनादरम्यान बैलगाडी तुटली व काँग्रेस कार्यकर्त्यांसह भाई जगताप ही खाली पडले. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून भाजप प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड, विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी ट्वीट करत खोचक टोला लगावला आहे.
- माणसाने झेपेल तेवढंच करावं - प्रसाद लाड प्रसाद लाड यांचे ट्वीट
...... भार उचलायला, 'बैलांचा नकार! तुम्हाला सांगू इच्छितो की, "माणसाने झेपेल तेवढंच करावं! असे पब्लिसिटी स्टंट करताना, त्या मुक्या जीवांचा विचार करावा!" अशी आक्षेपार्ह टीका लाड यांनी केली आहे. अशा प्रकारचे स्टंट करून आणि मुक्या जनावरांना इजा पोचवून काँग्रेसला काय साध्य करायचं आहे? असा सवाल देखील प्रसाद लाड यांनी केला आहे.
- राहुल गांधी यांच्याबद्दलच्या घोषणा बैलांनाही सहन झाल्या नाहीत - प्रविण दरेकर प्रविण दरेकर यांचे ट्विट