महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Congress Celebration : 'अबकी बार काँग्रेस सरकार' म्हणत निकालानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष - मुंबईत मिठाई वाटून जल्लोष

कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला बहुमत मिळवले. या विजयामुळे काँग्रेसच्या वतीने मुंबईत मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला. कर्नाटकमधील या विजयाचा जल्लोष काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्यभरात साजरा केला आहे.

Congress in Mumbai
काँग्रेसचा मुंबईत जल्लोष

By

Published : May 13, 2023, 7:01 PM IST

Updated : May 13, 2023, 8:24 PM IST

कर्नाटक निकालानंतर प्रतिक्रिया देताना काँग्रेस कार्यकर्ते

मुंबई: कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. काँग्रेसला बहुमत मिळाल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईत काँग्रेसकडून जल्लोष करण्यात आला. प्रदेश कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साहाचा जल्लोषचा आढावा घेतला आहे.



हुकूमशाही विरोधातील निकाल : यावेळी हा विजय हुकूमशाही विरोधातील विजय असल्याचे म्हणत, कर्नाटक मध्ये धर्माच्या नावावरती राजकारण केले गेले. त्याला कंटाळून जनतेने काँग्रेसच्या पारड्यात भरभरून असे मत दिले. हुकूमशाही भ्रष्टाचार आणि महागाई याच्या विरोधात हा निकाल आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत काँग्रेस नेहमी आग्रह राहिला. काँग्रेसचे राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो पदयात्रेचा फायदा कर्नाटक मध्ये पाहायला मिळतो. राज्यात देखील अबकी बार काँग्रेस सरकार अशा प्रकारची भावना येत्या काळात पाहायला मिळणार असल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगितले.


मिठाई वाटून विजयोत्सव: मुंबईतील महाराष्ट्र प्रदेश कार्यालय टिळक भवन परिसरात जल्लोष साजरा करण्यात आला. सकाळ पासूनच जसे जसे कर्नाटक निवडणूक कल येत होते, त्यात काँग्रेस आघाडी असल्याचे दिसत होते. तसेतसे काँग्रेस कार्यकर्ते टिळक भवन परिसरात दाखल होत होते. अशीच परिस्थिती आझाद मैदान जवळील मुंबई काँग्रेस कार्यलय परिसरात देखील होती. दुपारच्यां दरम्यान काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी गर्दी केली. यावेळी गळ्यामध्ये काँग्रेस पक्षाचा गमछा तर हातात काँग्रेसचा झेंडा घेऊन अबकी बार काँग्रेस सरकार, अशा प्रकारच्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. तसेच फटाके देखील फोडण्यात आले.

मिठाई वाटून विजयोत्सव साजरा:ढोल ताशांच्या तालावर काँग्रेस कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते देखील ठेका धरला. एकमेकांना पेढे भरत आपला आनंद व्यक्त केला. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने भाजपचा दारुण पराभव करत, १३७ जागांवर विजयी आघाडी घेत बहुमत मिळवले. कर्नाटकमधील या विजयाचा जल्लोष काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्यभरात साजरा केला. प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष व माजी मंत्री नसीम खान यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात मिठाई वाटून विजयोत्सव साजरा केला. यावेळी माजी खासदार हुसेन दलवाई, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राजन भोसले, संघटन सरचिटणीस प्रमोद मोरे, सचिव विनय राणे, झिशान अहमद, प्रवक्ते नासीर हुसेन यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


हेही वाचा -

  1. Congress Majority For Karnataka कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत 136 जागांवर विजय
  2. Devendra Fadnavis on Karnataka Result कर्नाटक निकालानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले महाराष्ट्रावर
  3. Rahul Gandhi कर्नाटकने द्वेषाचे राजकारण नाकारून प्रेमाचे राजकारण स्वीकारले राहुल गांधी
Last Updated : May 13, 2023, 8:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details