मुंबई: विधानभवनात पत्रकार परिषदेत बाळासाहेब थोरात बोलत होते. दरम्यान, खोके सरकार अशी घोषणा दिल्या आज तेच सत्तेत आहेत, असा प्रश्न विचारण्यात आला असता 'खोक्यावर खोके, एकदम ओके' असा खोचक टोला अजित पवार गटाला लगावला.
Congress On Opposition Leader: खोक्यावर खोके, एकदम ओके; विधानसभेत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता असणार - बाळासाहेब थोरात - विधानसभेत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांनी बंड केल्याने संख्याबळ कमी झाले आहे. विधानसभेत सध्या काँग्रेसचे आमदार जास्त आहेत. ज्याचे संख्याबळ जास्त त्यांचा विरोधी पक्षनेता असे महाविकास आघाडीचे सूत्र आहे. त्यानुसार गटनेते पदावर आमचा दावा राहील, वरिष्ठांशी चर्चा करून लवकरच नाव जाहीर करू, अशी माहिती काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली.
![Congress On Opposition Leader: खोक्यावर खोके, एकदम ओके; विधानसभेत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता असणार - बाळासाहेब थोरात Congress On Opposition Leader](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/16-07-2023/1200-675-19014435-thumbnail-16x9-thorat.jpg)
सत्तेतील आमदारांमध्ये अस्थिरता:राज्यात शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांचा गट सामील होताच, शिंदेंच्या आमदारांना डावलून राष्ट्रवादीला 9 मंत्रीपदे देण्यात आली. सत्तेतील आमदारांमध्ये अस्थिरता आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे सांगत वेळ मारली जाते. या सर्व घडामोडींमुळे राज्याकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. सत्तेच्या खुर्चीसाठी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. कांद्याला साडेतीनशे रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. अद्याप कांद्याचे अनुदान शेतकऱ्यांना मिळालेले नाही. महागाई, बेरोजगारी सारखे मुद्दे दुर्लक्षित आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनेक शहरात दंगली सुरू आहेत. सरकारला या सर्व प्रश्नांवर अधिवेशनात जाब विचारणार असल्याचे थोरात म्हणाले.
विधानसभेत विरोधी पक्षनेते पदावर कॉंग्रेसचा दावा:विधानसभेत विरोधकांचे संख्याबळ कमी झाले आहे. मात्र, जनतेत आम्हाला प्रतिसाद मिळतो आहे. जनतेची ताकद खरी ताकद असून आगामी निवडणुकीत दिसून येईल. तसेच विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून आम्ही दावा करणार आहोत. ज्यांची संख्या अधिक त्यांचा विरोधी पक्ष नेता, हे महाविकास आघाडीचे सूत्र आहे. त्यानुसार लवकरच आम्ही आमच्या विरोधी पक्षनेते पदासाठी अधिकृत नावाची वरिष्ठांशी बोलून घोषणा करू, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. मागच्यावेळी पन्नास खोकेच्या घोषणा देणारे आज सत्तेत सामील झाले आहेत. 50 टक्केच्या घोषणाचे काय? असा प्रश्न विचारण्यात आला असता, आता खोक्यावर खोके एकदम ओके, असे सांगत पवार गटावर टीकास्त्र सोडले. विधान परिषदेत मात्र विरोधी पक्ष नेत्यावर दावा करणार नाही, असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा:
- Jayant Patil on Opposition Leader : विरोधी पक्षनेते पद कोणाकडे? जयंत पाटलांनी स्पष्ट सांगितले, आम्ही फक्त कागदावरच....
- Devendra Fadnavis : अजित पवार-शरद पवार भेट; देवेंद्र फडणवीस म्हणाले, No Big Deal
- NCP Political Crisis : राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी शरद पवारांकडे केली दिलगिरी व्यक्त; मार्ग काढण्याची विनंती - जयंत पाटील