महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nana Patole : आम्ही महाराष्ट्राची नाही गुजरातची सेवा प्रामाणिकपणे करतो, सांगून टाका- नाना पटोले

वेदांत फॉक्सकॉन या उद्योगानंतर टाटा एअरबस हा हवाई दलासाठीचा विमान निर्मितीचा प्रकल्प देखील गुजरातला गेला. याआधी मल्टिपलक ड्रग्स हा प्रकल्प देखील गुजरातला गेला त्यामुळे शिंदे फडणवीस शासनाला विरोधी पक्षांनी आणि जनतेने कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलेला (Nana Patole criticized Shinde Fadnavis Govt) आहे . त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांनी बोचरी टीका ह्या शासनावर केली.

Nana Patole  criticized Shinde Fadnavis Govt
नाना पटोले यांनी फडणवीस सरकारवर टीका केली

By

Published : Oct 29, 2022, 12:25 PM IST

मुंबई :वेदांत फॉक्सकॉन या उद्योगानंतर टाटा एअरबस हा हवाई दलासाठीचा विमान निर्मितीचा प्रकल्प देखील गुजरातला गेला. याआधी मल्टिपलक ड्रग्स हा प्रकल्प देखील गुजरातला गेला त्यामुळे शिंदे फडणवीस शासनाला विरोधी पक्षांनी आणि जनतेने कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे. शासनावर चौफेर टीका सुरू आहे. तर शासनाच्यावतीने देखील हे पाप मविआ काळातील आहे, असे म्हटले (Nana Patole criticized Shinde Fadnavis Govt) आहे . त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमहाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांनी बोचरी टीका ह्या शासनावर केली.

एक लाख व्यक्तींना रोजगार गेला :फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. त्यावेळी एक लाख व्यक्तींना रोजगार त्यातून मिळणार होता, अशी माहिती समोर आली. 29 हजार कोटीची सवलत देखील देण्याचे ठरले होते. मात्र शिंदे फडणवीस शासनाने याबाबत सत्तेत असताना देखील तो प्रकल्प महाराष्ट्रात आणू शकले नाही. आणि आता टाटा एअरबस प्रकल्प देखील आणता आला नाही, अशी टीका विरोधकांनी केली आहे. यावर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खरमरीत बोचरी टीका केली आहे.

मिहानमध्ये स्पेशली इकॉनॉमिक झोन :वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प, मल्टी ड्रग्स प्रकल्प आणि टाटा एअरबस हा हवाई दलासाठीचा विमान निर्मितीचा 22 हजार रुपये कोटींचा प्रकल्प हा देखील गुजरातला गेला. यावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्या रोज आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झाडल्या जात आहे. यासंदर्भात नितीन गडकरींनी देखील तीन आठवड्यापूर्वी टाटासचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांना हा प्रकल्प नागपूर येथे यावा; यासाठी सूचना केली होती. या संदर्भातले पत्र 7 ऑक्टोंबर 2022 रोजी टाटा समोरच्या अध्यक्षांना नितीन गडकरींनी पाठवले होते .त्यात नागपूरमध्ये महाराष्ट्र सरकारने मिहानमध्ये स्पेशली इकॉनॉमिक झोन तयार केलेला आहे. मिहानमध्ये मुबलक प्रमाणात यासाठी जमीन उपलब्ध आहे. आपल्या व्यवसायासाठी उत्तम संधी आहे, असे त्यात नमूद केले होते. ही बाब देखील उघड (Nana Patole on Airbus Project) झाली.

केवळ घोषणा :मात्र आताचे शासन हा प्रकल्प रोखू शकले नाही. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खोचक आणि बोचरी टीका केलेली आहे. नाना पटोले यांनी म्हटले आहे की - या शिंदे फडणवीस शासनाने एकदाचे जाहीर करून टाका की- आम्ही गुजरातची सेवा प्रामाणिकपणे करत आहोत. आम्ही महाराष्ट्रातल्या युवकांना नोकरी देऊ शकत नाही. आम्ही बेरोजगार व्यक्तींना कामाला लावू शकत नाही. आम्ही केवळ घोषणा करू शकतो. त्यामुळे या शासनाने एकदा जाहीर करून टाकावा की - ते महाराष्ट्रासाठी नव्हे, तर गुजरात साठी काम करत आहेत. आता शासन तुमच्या हातात आहे. इच्छाशक्ती तुमच्याकडे असेल, तर तुम्ही निर्णय घेऊन उद्योग महाराष्ट्रात आणू शकला (Shinde Fadnavis Govt) असता.

ABOUT THE AUTHOR

...view details