महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nana Patole : मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा डोळा - नाना पटोले - state president Nana Patole

शरद पवारांच्या भूमिकेबाबत काँग्रेस पक्षात संभ्रम नसल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या वतीने ३ सप्टेंबरपासून पदयात्रा (Congress Padyatar from September 3) काढण्यात येणार असल्याची माहिती देखील नाना पटोले (Congress State President Nana Patole) यांनी दिली. मुंबईतील बीकेसी येथील एमसीए क्लबमध्ये बुधवारी महाराष्ट्र काँग्रेस कोअर कमिटीच्या बैठकीनंतर ते बोलत होते.

Nana Patole
Nana Patole

By

Published : Aug 16, 2023, 7:49 PM IST

मुंबई :राज्यातील काँग्रेस पक्षाची पदयात्रा ३ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. याबाबत बीकेसी येथील एमसीए क्लबमध्ये बुधवारी महाराष्ट्र काँग्रेस कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मोर्चाच्या रूपरेषेवर चर्चा करण्यात आली. राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघात आम्ही नियुक्त केलेल्या प्रभारींना 15 ऑगस्टपर्यंत त्यांचा लोकसभानिहाय अहवाल सादर करण्यास सांगण्यात आल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

बैठकीत विविध विषयांवर चर्चा : काँग्रेस कोअर कमिटीच्या बैठकीत अनेक ठिकाणांहून प्राप्त झालेल्या अहवालावर आज चर्चा करण्यात आल्याची माहिती देखील नाना पटोले यांनी दिली. आम्ही आज लोकसभेच्या तयारीवरही चर्चा केली. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावतीने आज आमच्या बैठकीला दोन प्रतिनिधीही उपस्थित होते. 31 ऑगस्ट रोजी झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीचाही आम्ही आढावा घेतला आहे.

काँग्रेसच्या वतीने 3 सप्टेंबरपासून राज्यभर पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र काँग्रेस कोअर कमिटीची बैठक बीकेसी येथील एमसीए क्लबमध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली - नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

आमचा कोणताही बी प्लॅन नाही : शरद पवार, अजित पवार यांच्या भेटीत काँग्रेस, ठाकरे गटाचा प्लॅन बी तयार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र तसा आमचा कोणताही बी प्लॅन नसल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र हा काँग्रेसचा आधार आहे. काँग्रेसला मतदारांना एकत्र करायचे आहे. भाजपाला सत्तेतून बेदखल करण्यासाठी आमचा प्लॅन बी तयार असल्याचे ते म्हणाले. शरद पवार यांच्याबाबत काँग्रेसच्या मनात कोणताही संभ्रम नाही. लोकांमध्ये असलेला संभ्रम आम्ही त्यांना कळवला आहे. मल्लिकार्जुन खरगे यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा केली आहे. शरद पवार यांच्याबाबत काँग्रेसच्या मनात कोणताही संभ्रम नसल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा डोळा : महाविकास आघाडीत अडचण नाही. महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवणार असल्याने आमचा विजय निश्चित आहे. दोन उपमुख्यमंत्री हे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा ठेवून आहेत, असा हल्लाबोल देखील नाना पटोले यांनी महायुती सरकारवर केला आहे.

काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, तेलंगणा राज्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, बसवराज पाटील, ए. कुणाल पाटील, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे आदी नेते उपस्थित होते.

हेही वाचा -

  1. Supriya Sule on Meeting : नातं आणि राजकीय वैचारिकता वेगळी - सुप्रिया सुळे यांची स्पष्टोक्ती
  2. Sharad Pawar : मणिपूरमध्ये मोदी सरकार बघ्याच्या भूमिकेत, पंतप्रधानांनी तेथे जायला हवे, शरद पवार मोदींवर बरसले
  3. Politics over Pawar Meeting : 'गुप्त' भेटीत शरद पवारांना मंत्रीपदाची ऑफर? आघाडीतील सहकाऱ्यांमध्ये अस्वस्थता

ABOUT THE AUTHOR

...view details