मुंबई -सध्या देशामध्ये महागाईचा आगडोंब आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडत असून दररोज इंधनाचे दर वाढत आहेत. केवळ काही मोजक्या व्यापाऱ्यांचे खिसे भरले जातील, अशी नीती केंद्र सरकार ( Central Government ) वापरत आहे. अशीच परिस्थिती देशांमध्ये राहिल्यास आपल्या देशाची ही परिस्थिती श्रीलंकेसारखी होण्यास विलंब लागणार नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress State President Nana Patole ) यांनी दिला. आपल्या निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केंद्र सरकारवर त्यांनी निशाणा साधला ( Nana Patole Criticism on Central Government ).
केंद्र सरकार सामान्य जनतेचे लक्ष विचलित करत आहे - केंद्र सरकार ( Central Government ) बेरोजगारी, महागाई या विषयांवर काहीच न बोलता मुळ मुद्द्यापासून केंद्र सरकार जनतेला दूर नेत आहे. केवळ धार्मिक मुद्द्यांवर वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचा आहे. मूळ मुद्द्यांपासून सामान्य जनतेचे लक्ष विचलित व्हावे, असे षड्यंत्र केंद्र सरकार करत आहे, अशीही टीका नाना पटोले यांनी केली आहे.