महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साध्वी प्रज्ञांकडे तारक मारक अस्त्र; म्हणून त्यांची संरक्षण समितीवर निवड - congress spokesperson sachin sawant criticized on pragya thakur

केंद्रात संसदीय संरक्षण समितीवर प्रज्ञा ठाकूर यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. यावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी तिरकस टोला लगावला आहे. ठाकूर यांची नेमणूक होणे ही काही मोठी आश्चर्याची गोष्ट नाही. यामागे त्यांचे ज्ञान आहे, जे त्यांनी मालेगाव बॉम्बस्फोट संदर्भात केले. हे सर्वांच्या लक्षात आहे, की बॉम्ब बनवण्याचे तंत्रज्ञान त्यांना माहिती आहे, अशाप्रकारे सावंत यांनी ठाकूर यांच्या नेमणुकीवर टीका केली आहे.

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत

By

Published : Nov 21, 2019, 6:13 PM IST

मुंबई -केंद्रात संसदीय संरक्षण समितीवर प्रज्ञा ठाकूर यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. यावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी तिरकस टोला लगावला आहे. ठाकूर यांची नेमणूक होणे ही काही मोठी आश्चर्याची गोष्ट नाही. यामागे त्यांचे ज्ञान आहे, जे त्यांनी मालेगाव बॉम्बस्फोट संदर्भात केले. हे सर्वांच्या लक्षात आहे, की बॉम्ब बनवण्याचे तंत्रज्ञान त्यांना माहिती आहे. अशाप्रकारे सावंत यांनी ठाकूर यांच्या नेमणुकीवर उपरोधीक टीका केली आहे.

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत याची खासदार प्रज्ञा ठाकूर यांच्यावर टीका

हेही वाचा - सेक्युलॅरिझमबाबत संजय राऊत यांचे मोठे विधान, म्हणाले...

सावंत म्हणाले, प्रज्ञा ठाकूर यांच्याकडे तारक मारक अस्त्र आहे. त्याचा उपयोग देशाच्या जवानांना होऊ शकतो. अशी भावना पंतप्रधान मोदी यांची असू शकते म्हणूनच प्रज्ञा ठाकूर यांची नेमणूक करण्यात आली असल्याचेही सावंत यावेळी म्हणाले.

गेल्यावर्षी साध्वी प्रज्ञा यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यावरून पंतप्रधान मोदी यांनी आपण साध्वी प्रज्ञा यांना कधी माफ करणार नाही असे सांगितले होते. सावंत पुढे म्हणाले, साध्वी प्रज्ञा यांची संरक्षण समितीवर नेमणूक झाल्यावर सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. मोदींनी ठाकूर यांना माफ केले आहे. म्हणूनच साध्वी प्रज्ञा यांची समितीवर नेमणूक करण्यात आली अशी चर्चा सर्वत्र होती. मात्र मोदी यांनी जर त्यांना माफ केले असते तर त्यांना देशाचे गृहमंत्री किंवा संरक्षण मंत्री केले असते अशी खोचक टीका त्यांनी केली.

हेही वाचा - शिवसेनेसोबत जाणे म्हणजे स्वतःला दफन करून घेणे; निरुपम यांचा काँग्रेसला घरचा आहेर

ABOUT THE AUTHOR

...view details