मुंबई - काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांचा भाऊ सुनील वाघमारे यास बलात्काराच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आलेली आहे. मुंबई महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक राहिलेल्या सुनील वाघमारे याला एका महिलेवर बलात्कार, फसवणूक, व धमकावण्याचा आरोपाखाली अटक करण्यात आलेली आहे. मुंबईतील भोईवाडा पोलीस ठाण्यांमध्ये यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता व तो तपासासाठी लोणावळा पोलीस स्टेशनमध्ये वर्ग करण्यात आलेला होता. त्यानुसार सुनील वाघमारे यास अटक करण्यात आलेली आहे.
सदरच्या महिलेने केलेल्या तक्रारीनुसार, राजू वाघमारे यांचा भाऊ सुनील वाघमारे याने पीडित महिलेला लग्नाचे आमिष देऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला. यानंतर पीडितेने लग्नाबद्दल विचारले असता, सुनील वाघमारेने पीडित महिलेला धमकी दिली देऊन तिच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, असा आरोप पीडितेने केला आहे.
हेही वाचा -मंगळवारपासून 'मेरीटाईन इंडिया समिट 2021'ची सुरुवात; 24 देशातील प्रतिनिधी होणार सामील
काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांच्या भावाला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक - सुनील वाघमारेला बलात्कार प्रकरणी अटक न्यूज
काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांचा भाऊ सुनील वाघमारे यास बलात्काराच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आलेली आहे.
काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांच्या भावाला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक